मेंदूत तयार होत असेल कॅन्सरची गाठ तर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 10:42 AM2023-12-20T10:42:28+5:302023-12-20T10:43:15+5:30

Symptoms of brain tumor : ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो आणि याची लक्षण त्याचं स्थान आणि आकारावर अवलंबून असतात.

Early signs and symptoms of brain tumor | मेंदूत तयार होत असेल कॅन्सरची गाठ तर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच व्हा सावध!

मेंदूत तयार होत असेल कॅन्सरची गाठ तर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच व्हा सावध!

Symptoms of brain tumor : ब्रेन ट्यूमर मेंदूच्या भागात होणारी एक गाठ आहे. जी सतत वाढत जाते. ही गाठ एक गोलाकार गाठ असते. यामुळे मेंदूच्या चांगल्या कोशिका वाढू शकतात. याकारणाने मेंदूचं कामकाज पूर्णपणे प्रभावित होऊ शकतं. ब्रेन ट्यूमरचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. तसेच याची कारणेही वेगवेगळी असतात.

ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो आणि याची लक्षण त्याचं स्थान आणि आकारावर अवलंबून असतात. जेव्हा ब्रेन ट्यूमर फार लहान असतो तेव्हा काही लोकांना कोणतंही लक्षण दिसत नाही किंवा लक्षणं इतकी सौम्य असतात की, त्यावर लक्ष दिलं जात नाही. जसजसा ब्रेन ट्यूमर वाढतो याचे संकेत आणि लक्षणं वेगवेगळे असू शकतात.

ब्रेन ट्यूमरची लक्षणं

डोकेदुखी आणि चक्कर

NBTS नुसार, जर तुम्हाला नियमितपणे डोकेदुखी होत असेल आणि त्यासोबत चक्कर येत असेल तर हा ब्रेन ट्यूमरचा संकेत होऊ शकतो.

1) धुसर दिसणे - डोळ्यांची दृष्टी धुसर होणे किंवा दिसण्यात काही बदल होणे हाही ब्रेन ट्यूमरचा संकेत होऊ शकतो.

2) मांसपेशी कमी होणे - ट्यूमरच्या भागात मांसपेशींमध्ये वेदना आणि कमतरता होणे.

3) भाषा किंवा बोलण्यात अडचण - जर तुम्हाला बोलण्यात समस्या होत असेल किंवा भाषेत बदल झाला असेल यावर दुर्लक्ष करू नये.

4) समजण्याची-विचार करण्याची क्षमता कमी होणे - व्यक्तीला कोणतेही निर्णय घेण्यात अडचण येत असेल हेही याचं एक लक्षण आहे

5) अचानक वजन कमी होणे - जर तुमचं वजन विनाकारण कमी होत असेल तर याकडेही गंभीरतेने बघायला हवं.

6) थकवा-कमजोरी - अचानक येणारी कमजोरी किंवा थकवा हेही याचं एक लक्षण असू शकतं.

7) पुन्हा पुन्हा उलटी - नियमितपणे उलटी किंवा मळमळ होणे हे याचं एक लक्षण आहे. ट्यूमरच्या प्रभावामुळे नियमित उलट्या होऊ शकतात.

Web Title: Early signs and symptoms of brain tumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.