'या' सवयीमुळे कमी असतो हृदयरोग आणि डायबिटीसचा धोका, लगेच लावा ही सवय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:57 AM2019-06-03T10:57:17+5:302019-06-03T11:05:50+5:30
सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये हृदयरोग आणि डायबिटीस या दोन आजारांचा मोठा धोका जास्तीत जास्त लोकांना होतो आहे. हा धोका दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये बदल करावा लागेल.
(Image Credit : Bel Marra Health)
जर तुम्ही रात्री लवकर झोपत असाल तर तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे. पण जे लोक रात्री उशीरा झोपतात, त्यांनी उशीरा झोपण्याचे नुकसान आणि लवकर झोपण्याच्या फायद्यांबाबत नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. एका रिसर्चनुसार, जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत किंवा लवकर झोपत नाहीत. अशा लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पुरेसा आराम केल्याने आणि लवकर झोपल्याने तुम्ही अधिक सकारात्मक राहू शकता. चला जाणून घेऊ लवकर झोपण्याचे फायदे.
विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता
(Image Credit : johnacademy.co.uk)
आपली समज आणि झोपेचा थेट संबंध आहे. असे मानले जाते की, जी व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत आणि लवकर झोपत नाहीत. ते मानसिक रूपाने स्वत:ला फिट ठेवू शकणार नाही आणि त्यांच्या विचार करण्याच्या व समजून घेण्याच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडेल. चांगली झोप वास्तवात तुमची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवू शकते आणि याने तुमचा मेंदू स्थिर राहतो.
ऑफिसमधील काम अधिक चांगलं
(Image Credit : AvePoint)
तुम्ही लवकर झोपत असाल आणि पुरेशी झोप घेत असाल तर याने तुमची प्रोडक्टिविटीही वाढते. याने केवळ तुमची एकाग्रताच वाढत नाही तर तुमची स्मरणशक्तीही वाढते. तुम्हाला थकवा सुद्घा जाणवणार नाही. याने होईल असं की, तुमची कार्यक्षमता वाढेल.
वजन राहील नियंत्रणात
जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा नियंत्रित ठेवायचं असेल तर पुरेशी झोप घेणे सुरू करा. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, जी व्यक्ती रात्री उशीरा झोपते किंवा पुरेशी झोप घेत नाहीत त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लवकर झोपा आणि लवकर उठा.
रहा फिट आणि हेल्दी
(Image Credit : Ezyshine)
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी रोज लवकर झोपायला पाहिजे आणि पुरशी झोप घ्यायला पाहिजे. पुरेशी झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरस आणि बॅक्टेरियासोबत चांगल्याप्रकारे लढू शकते. तसेच झोप पूर्ण झाल्यावर रक्तात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाणही कमी होते. आणि रोगप्रतिकारक शक्तीची प्रक्रिया चांगली होते.
क्रॉनिक डिजीजपासून बचाव
(Image Credit : Medical Aid)
पुरेशी झोप घेणे आणि लवकर झोपण्याने अनेकप्रकारच्या क्रॉनिक डिजीजचा धोका कमी केला जाऊ शकतो आणि जास्त आयुष्य जगता येऊ शकतं. काही शोधांमधून समोर आलं आहे की, जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांना टाइप २ डायबिटीस, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबचा धोका अधिक असतो.