ना खर्च ना जास्त मेहनत...वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि चांगला उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 10:09 IST2019-08-13T10:01:34+5:302019-08-13T10:09:37+5:30
अलिकडे प्रत्येक तीसरी व्यक्ती वजन कमी करण्याचा सोपा उपाय शोधत आहे. अनेकांसाठी वजन कमी करणं फार अवघड होतं.

ना खर्च ना जास्त मेहनत...वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि चांगला उपाय!
(Image Credit : www.besthealthmag.ca)
अलिकडे प्रत्येक तीसरी व्यक्ती वजन कमी करण्याचा सोपा उपाय शोधत आहे. अनेकांसाठी वजन कमी करणं फार अवघड होतं. अनेकजण खूप मेहनत घेतात आणि वेगवेगळे उपाय करतात. काहींना फायदा होतो, पण काहींना होत नाही. अनेकजण निराश होतात. पण तसं पहायला गेलं तर वजन कमी करणं तेवढही कठीण नाही. याचा वेगवेगळ्या उपायांपैकी एक सोपा उपाय आहे. नुकत्याच एका रिसर्चमध्ये समोर आलं की, जर व्यक्तीने ठरवलं तर ती व्यक्ती सहजपणे वजन कमी करू शकते. वजन नियंत्रित ठेवण्याचा एक सोपा उपाय आहे. चला जाणून घेऊ काय आहे तो उपाय...
मानसिक शांती
जर तुम्ही मानसिक शांतता मिळवाल तर तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकाल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करून थकले असाल, तर तुम्ही आता मानसिक शांती याबाबत विचार केला पाहिजे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल तर तुम्ही सहज वजन कमी करू शकता.
हे कसं होतं?
मानसिक शांतता मिळवून वजन कसं कमी केलं जातं? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की, वजन वाढण्यासाठी तणाव आणि चिंता या दोन गोष्टीही जबाबदार आहेत. त्यामुळे मानसिक शांतता मिळवणे फार गरजेचे आहे. तज्ज्ञांनुसार, आनंदी राहून व्यक्ती अनेक किलो वजन कमी करू शकते.
जेव्हा तुम्ही तणाव किंवा चिंतेत असता तेव्हा नकारात्मक विचारांमधून जात असता. यामुळे शरीरात कार्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढतं. आणि जेव्हा शरीरात कार्टिसोलचं प्रमाण वाढतं तेव्हा तुम्हाला जास्त थकवा जाणवतो. या कारणाने तुम्ही व्यायामाकडे दुर्लक्ष करता. या स्थितीत तुम्ही अशा पदार्थांकडे आकर्षित होतात जे वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात.
(Image Credit : thehealthsite.com)
वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की, जेव्हा व्यक्ती आनंदी राहतो तेव्हा शरीरात डोपामाइन हार्मोनचं प्रमाण वाढतं. डोपामाइन हार्मोन हे हॅपी हार्मोन म्हणूनही ओळखले जातात. याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. जे लोक आनंदी राहतात त्यांच्यात तणाव कमी असतो. एका रिसर्चनुसार, जर तुम्ही आनंदी रहाल तर एक मिनिटात १० कॅलरी बर्न होतात.
आनंदी राहण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी काय कराल?
आनंदी राहण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचा मुख्य उपाय आहे लाइफस्टाईल नियमित करावी. आनंदी राहण्यासाठी नियमित एक्सरसाइज करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. कॉमेडी सिनेमे बघा. सकारात्मक विचार करा.