हे सोपे उपाय करूनही सायनसची समस्या होईल दूर, एकदा करून बघाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:46 AM2019-11-20T10:46:48+5:302019-11-20T10:53:59+5:30
थंडीचे दिवस सुरू झाल्याने इतर वेळी लोकांना होणारा सायनसचा त्रास तुलनेने जास्त होतो. सर्दी, डोकेदुखी यांसारखे आजार डोकावू लागतात.
थंडीचे दिवस सुरू झाल्याने इतर वेळी लोकांना होणारा सायनसचा त्रास तुलनेने जास्त होतो. सर्दी, डोकेदुखी यांसारखे आजार डोकावू लागतात. सध्याच्या काळात एसीच्या अति वापरामुळे आणि थंड अधिक प्यायल्यामुळे सायनसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अशात हिवाळ्याच्या दिवसात निर्माण होणाऱ्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर या काही टिप्स नक्की वाचा.
सायनसमध्ये एका प्रकारे पातळ स्त्राव होत असतो. त्याला म्युकस असे म्हणतात.काही कारणामुळे सायनसमध्ये म्युकस जास्त प्रमाणात वाहू लागतो. तेव्हा तो नाकाद्वारे बाह्रेर पडतो. त्यालाच सर्दी होणे असे म्हणतात. नाकात जास्त म्यूकस जमा होतो. तेव्हा नाकावाटे वाहून न गेल्यास तेव्हा म्यूकस नाकामध्येच साठून राहतो. त्यामुळे साठून राहिलेल्या म्यूकसमध्ये इन्फेक्शन होऊन नाकाला सूज येते. आजकाल तरूणांमध्ये ही समस्या जास्त आढळून येते. चला तर मग जाणून घेऊया सायनसची लक्षणे आणि त्यावरील उपाय.
सायनसची लक्षणेः
1) सायनसच्या वेदना सकाळी जास्त जाणवतात.
२) डोके दुखणे, डोक्याची हालचाल केल्यास तीव्र वेदना होतात.
३) ताप येणे, चेहरा सुजणे, नाक चेंदणे ही लक्षणे दिसून येतात.
४) सायनसच्या ठिकाणी वेदना होतात.
५) डोळ्यांच्या आणि नाकाच्या हाडांमध्ये वेदना होतात.
सायनसचा त्रास होऊ नये म्हणून काय करावेः
१) सायनसचा त्रास जास्त होत असल्यास एसी आणि फॅनचा वापर टाळावा.
२) सर्दी खोकला होऊ देऊ नये.
३) धूळ, धूर आणि हवा प्रदुषण टाळावे.
४) धुम्रपान, मद्यपान, यांसारखी व्यसनं टाळवीत.
५)दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.