बारीक होण्यासाठी उपाय करून थकलात,  मग आवळ्यामुळे तुमची ही समस्या नक्की होईल दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:02 PM2019-11-25T12:02:36+5:302019-11-25T12:10:10+5:30

आवळ्याचे अनेक औषधी गुण आपल्याला माहीत असतात. आवळा हा हिवाळ्यात बाजारात सर्वत्र पाहायला मिळतो.

easiest way of weight loss using aamla | बारीक होण्यासाठी उपाय करून थकलात,  मग आवळ्यामुळे तुमची ही समस्या नक्की होईल दूर...

बारीक होण्यासाठी उपाय करून थकलात,  मग आवळ्यामुळे तुमची ही समस्या नक्की होईल दूर...

googlenewsNext

 (Image credit-lifeberrys)

आवळ्याचे अनेक औषधी गुण आपल्याला माहीत असतात. आवळा हा हिवाळ्यात बाजारात सर्वत्र पाहायला मिळतो. तसेच आवळा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून चरबी घटवण्यासाठी आवळा फायदेशीर ठरत असतो. तसेच आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ महिला या काळात बनवत असतात. त्यात आवळ्याचं लोणचं, आवळ्याचा मोरांबा, आवळयाचा रस यांचा समावेश असतो. चला तर मग जाणून घेऊया आवळा खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

(Image credit-flipcart)

वजन कमी करण्यासाटी जे जे पदार्थ खाल्ले जातात. त्यात आवळा हा महत्त्वाचा आहे. कारण आवळा बाजारात सहज मिळतो. शरीरातील अतीरीक्त चरबी घटवण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच आवळ्यात विटामीन सी आणि अॅन्टी ऑक्सीडेंटस असतात. आवळ्याचा रस दररोज प्यायल्यास लठ्ठपणा दूर होतो.

(Image credit-India today)

शरीरातील चरबीशी सामना करण्यसाठी आवळा सुपरफुड समजला जातो. आवळ्यामुळे रोगप्रतिकारक  वाढते. तसेच त्यामुळे मॅटाबॉलीजम रेट सुधारतो. त्यामुळे शरीरातील चरबी जलद गतीने कमी होते. आवळ्याच्या सेवनाने कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.आणि हृद्याशी निगडीत आजारांपासून दूर राहणे सोपे होते. ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. यामुळे पोट नियमीतपणे साफ होऊ लागते.

(Image credit-Netmade.com)

याशिवाय नियमीत आवळ्याच्या सेवनाने शारीरिक व मानसिक थकवा दूर होऊन उत्साह व स्फूर्ती वाढते. सुकलेले आवळे तसेच धने समप्रमाणात घेऊन रात्री मातीच्या भांड्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर मिसळून प्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबते तसेच मुत्ररोगांमध्ये लाभ होतो.

Web Title: easiest way of weight loss using aamla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.