डोकेदुखीने हैराण आहात? 'या' उपायांनी मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 07:18 PM2019-01-28T19:18:16+5:302019-01-28T19:19:18+5:30

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटकेच्या विश्रांतीलादेखील वेळ नाही. ताण, तणाव, चिंता यामुळे तरुणांमध्ये झोप न येण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुणपणी शरीर ठणठणीत असल्यामुळे याचे फार परिणाम दिसून येत नाहीत; पण उतार वयात याचा त्रास सहन करावा लागतो.

Easy home remedies to get rid off headache | डोकेदुखीने हैराण आहात? 'या' उपायांनी मिळेल आराम!

डोकेदुखीने हैराण आहात? 'या' उपायांनी मिळेल आराम!

googlenewsNext

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटकेच्या विश्रांतीलादेखील वेळ नाही. ताण, तणाव, चिंता यामुळे तरुणांमध्ये झोप न येण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुणपणी शरीर ठणठणीत असल्यामुळे याचे फार परिणाम दिसून येत नाहीत; पण उतार वयात याचा त्रास सहन करावा लागतो. शांत झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु, जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि झोप आवरत नसेल तर अशावेळी तुम्ही काय करता? बॉसच्या नकळत पटकन एक छोटीशी डुलकी घेता ना? पण अनेकदा ही छोटीशी डुलकी फार त्रासदायक ठरते. 

छोट्याशा डुलकीमुळे फ्रेश वाटण्याऐवजी अनेकदा डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, कामादरम्यान घेतलेली छोटीशी डुलकी डोकेदुखी दूर करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत करते. पण बऱ्याचदा असं न होता, डोकेदुखीचा त्रास हैराण करतो. असाच काहीसा प्रकार जास्त झोप घेतल्यामुळेही होतो. गरजेपेक्षा जास्त झोपल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला जास्त झोपेमळे उद्भवणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत...

जास्त झोपल्यानंतर होणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी आल्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे मेंदूमधील रक्त वाहिन्यांमधील सूज कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे तुम्ही आल्याचा रस किंवा आल्याच्या चहाचे सेवन करू शकता. 

जास्त वेळ झोप घेतल्याने होणाऱ्या डोकेदुखीपासून बचाव करण्यासाठी कॅफेनचं सेवन कमी प्रमाणात करणं आवश्यक असतं. जास्त कॅफेन घेतल्याने अनिद्रेची समस्या उद्भवू शकते. 

जर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर जास्त झोप घेतल्याने तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. कॉफी, अल्कोहोल आणि आंबट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे डोकेदुखीपासून बचाव करण्यासाठी पूर्ण दिवसामध्ये मुबलकप्रमाणात पाण्याचे सेवन करावे.

जास्त वेळ झोपल्यानंतर उद्भवणाऱ्या डोकेदुखीला दूर करण्यासाठी योगादेखील फायदेशीर ठरतो. योगा केल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि डोकं शांत ठेवण्यासाठी मदत करतो. 

गरजेपेक्षा जास्त झोपल्याने मेंदूमधील सिरोटोनिन किंवा न्यूरोट्रांसमीटरमध्ये असंतुलन निर्माण होतं. जास्त झोप घेतल्याने तुमच्या झोपेच्या वेळेवर परिणाम होतो आणि त्यामुळे नंतर झोप येत नाही. 

Web Title: Easy home remedies to get rid off headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.