स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे सोपे मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:15 AM2017-08-17T02:15:32+5:302017-08-17T02:15:35+5:30
पावसाळ्यात अनेकांना स्नायूंच्या दुखण्याला सामोरे जावे लागते.
पावसाळ्यात अनेकांना स्नायूंच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. या काळात चिखलाने भरलेल्या रस्त्यांवरून जाण्याचे कष्टप्रद आव्हान पेलताना आणि ओल्या निसरड्या फरसबंदीवरून चालताना, तुमच्या शरीराला काही ना काही दुखापत होते. मात्र, अशा वेदनेपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. दुखावणाºया स्नायूंना या काही साध्या तेलांनी मालीश केले तर तुमचे दुखणे कमी होईल आणि तुमच्या शरीराला ताजेतवाने आणि हलके वाटेल. पाहू या अशा काही तेलांची माहिती...
लँग लँग आॅइल
लँग लँग आॅइल हे कनांगा ओडोराटा या वनस्पतीच्या फुलापासून तयार केले जाते. या वनस्पतीची लागवड प्रामुख्याने इंडोनेशिया, फिलिपीन्स आणि मलेशियात केली जाते. हे तेल त्याच्या अप्रतिम सुगंधामुळे ओळखले जाते. हे तेल शरीरावर लावल्यास स्नायूंची वेदना दूर करणे. लँग लँग आॅइल आॅलिव्ह कॅरियर आॅइलमध्ये समप्रमाणात मिसळून हलक्या हाताने पोटºया, बाहू आणि अन्य ठिकाणच्या दुखणाºया स्नायूंवर चोळावे.
पेपरमिंट आॅइल
पेपरमिंट आॅइलचा सुगंध सर्वोत्कृष्ट ताजेपणा देणारा आहे. श्वासाला ताजेपणा देण्याशिवाय पेपरमिंट आॅइलमध्ये अनेक गुणधर्म आहेत. पचनशक्ती वाढवण्याबरोबरच शरीरातील ऊर्जा वाढवण्यातही ते साहाय्यक ठरते. महत्त्वाचे म्हणजे दुखºया स्नायूंना मसाज करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पेपरमिंट आॅइल तुमच्या पसंतीच्या कॅरियर आॅइलमध्ये समप्रमाणात मिसळून दुखावलेल्या भागावर काही मिनिटे मसाज करा. त्यामुळे दुखावलेले स्नायू मोकळे करण्याकरिता मदत होईल
जरेनियम आॅइल : प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंध प्रदेशात या फुलाची लागवड केली जाते. जरेनियम फुल त्याच्या लोभस अशा रंग आणि सुगंधामुळे ओळखले जाते. या फुलापासून काढलेल्या तेलाचा वापर नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी केला जातो. त्याशिवाय हार्मोनशी संबंधित समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. या तेल आॅलिव्ह आॅइलमध्ये मिसळून त्याचा वापर केल्यास स्नायूचे दुखणे कमी होते.
>रोझमेरी आॅइल
रोझमेरीचे तेल हे स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठीचे उत्तम मसाज तेल आहे. त्याचा वापर करण्याआधी त्यात काही थेंब तिळाच्या तेलासारखे काही कॅरियर आॅइल मिसळून ते विरल करा. त्यानंतर त्याने दुखावलेल्या स्नायूवर मालीश करा. रात्री मालिश केल्यानंतर स्नायू मोकळे होतील. तुम्हाला ताजातवाना, वेदनामुक्त अनुभव सकाळी येईल.
>लॅव्हेंडर आॅइल
लॅव्हेंडरचा सुगंध थंडावा देणारा, मन शांत व प्रसन्न करणारा आहे. या फुलझाडात ताजेपणा देणारा आणि स्वच्छतेचा असे दोन्ही गुणधर्म आहेत. सौंदर्यसाधनेच्या अनेक उत्पादनांत त्याचा वापर केला जातो. स्नायूंच्या वेदनेवर, स्नायूंच्या थकव्यावरही त्याचा उपयोग होतो. या तेलाचे काही थेंब थकलेल्या स्नायूंवर लावले तर त्यातून दुखणे कमी होते. या तेलाने मसाज केले तर चांगली झोप लागते.