प्रवासात तब्बेत जपण्याचे सोपे उपाय

By admin | Published: April 27, 2017 05:32 PM2017-04-27T17:32:21+5:302017-04-27T17:32:21+5:30

प्रवास करताना थोडी खाण्यापिण्याची आणि व्यायामाचीही काळजी घेतली तर आपल्यासोबत सगळ्यांचीच सहल आनंददायी होते.

The easy way to live in the journey | प्रवासात तब्बेत जपण्याचे सोपे उपाय

प्रवासात तब्बेत जपण्याचे सोपे उपाय

Next

 

-अमृता कदम

तुम्ही जेव्हा प्रवासाला निघता तेव्हा वेगळ्या ठिकाणी गेल्यावर हवामानात होणारा बदल, खाण्या-पिण्यातले बदल, धावपळ याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. सर्दी-पडशासारख्या काही किरकोळ तक्रारींबरोबरच कदाचित काही गंभीर त्रासही होऊ शकतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्यांचाही रसभंग होतो. म्हणूनच प्रवास करताना थोडीशी काळजी घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि आरोग्यदायीही होईल. 

 

 

                                              

* प्रवासामध्ये सतत काही ना काही खाणं (बऱ्याचदा ते अरबट-चरबट सदरात मोडणारंच असतं) सुरूच असतं. त्यामुळे खाणं झालंय ना असं म्हणत किंवा खूपदा भटकण्याच्या नादात जेवायंच राहून जातं. असं अजिबात करु नका. नाश्ता आणि दुपारचं जेवण शक्यतो टाळू नका. संध्याकाळी मग थोडंस हलकं काहीतरी खाल्लं तरी चालेल. प्रवासातलं खाण हे स्वच्छ आणि आरोग्यदायी असावं. प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं खायला मिळेलच असं नाही. त्यामुळे घरून निघताना थोडा कोरडा खाऊ सोबत ठेवावा. तसंच शक्य तेव्हा फळंही खावीत.

* प्रवासातली खाण्यापिण्यातली जी काही कमतरता असेल ती दूर करण्यासाठी आणि स्वत:ला उत्साही, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्याही घेऊ शकता. या गोळ्यांचे काही साइड-इफेक्टस नसतात. पण तरीही एकदा डॉक्टरांचा सल्लाही घेतलेला चांगला.

* भरपूर फिरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर सगळ्यात जास्त नुकसान होतं ते तुमच्या त्वचेचं. शिवाय आजकाल वातावरणातले विविध घटक, खाद्यपदार्थ यांसरख्या गोष्टींची अ‍ॅलर्जी ही देखील खूप कॉमन गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रवासात बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला आणि गॉगल्स घालायला विसरु नका. त्याचबरोबर कोरड्या हवेच्या ठिकाणी फिरायला गेला असाल तर तुमच्या त्वचेला योग्य प्रकारे मॉश्चराईजही करा. नाहीतर अशा ठिकाणी त्वचा कोरडी पडते. प्रवासाहून परत येताना सोबत घेऊन यायचे असतात ते आनंदाचे क्षण आणि मजेशीर आठवणी. आजारपण किंवा दुखणी नाही. म्हणूनच प्रवास करताना काही पथ्यं आवर्जून पाळली तर खऱ्या अर्थानं आपला प्रवास ‘हॅपी जर्नी’ होतो.

 

                                                                                                                                                           

Web Title: The easy way to live in the journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.