रात्रभर चांगली झोप येत नाही का? मग वापरा 'या' खास टिप्स आणि द्या मस्त ताणून!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:30 AM2019-11-27T11:30:34+5:302019-11-27T11:38:21+5:30

अनेकांना रात्री चांगली झोप न येण्याची समस्या असते. चांगल्या आरोग्यासाठी आणि मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

Easy ways to improve your sleep cycle | रात्रभर चांगली झोप येत नाही का? मग वापरा 'या' खास टिप्स आणि द्या मस्त ताणून!

रात्रभर चांगली झोप येत नाही का? मग वापरा 'या' खास टिप्स आणि द्या मस्त ताणून!

googlenewsNext

अनेकांना रात्री चांगली झोप न येण्याची समस्या असते. चांगल्या आरोग्यासाठी आणि मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप गरजेची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे हृदयरोग, मानसिक त्रास, डिप्रेशन, तणाव, डायबिटीसचा धोका वाढतो. रात्री जर तुम्ही चांगली झोप घेत नसाल तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. चला जाणून घेऊ चांगली झोप येण्यासाठी काही खास टीप्स... 

(Image Credit : thechalkboardmag.com)

काही लोकांना झोप न येण्याचा आजार असतो. त्यांच्यासाठी रात्री झोप लागणं फारच कठीण असतं. याचं मुख्य कारण असतं त्यांची बॉडी क्लॉक अनियमित होणं. यात आपल्या शरीराने कधी झोपावं, कधी उठावं हे सांगितलं जातं. तुम्हालाही तुमची बॉडी क्लॉक रिसेट करायची असेल तर काही गोष्टींचा विशेष काळजी घ्यावी लागले.

(Image Credit : blog.mypacer.com)

सकाळचा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी अनेकदृष्टीने फायदेशीर आहे. त्याचा फायदा चांगल्या झोपेसाठीही होतो. सकाळी उठल्यावर उन्हात बसणे किंवा फिरायला जाणे गरजेचे आहे. तसेच घरात उन्ह यावं म्हणून घराची दारे-खिडक्या उघड्या ठेवू शकता. सकाळच्या उन्हामुळे तुमची बॉडी क्लॉलही रिसेट होते.

(Image Credit : medicalnewstoday.com)

रात्री हलकं जेवण करणं फार गरजेचं आहे. कारण रात्री जेव्हा आपण जास्त किंवा जड पदार्थ खातो त्याने अपचनाची समस्या होते. त्यासोबतच आतड्यांवर जास्त जोर पडू लागल्याने सेरोटोनिन हार्मोन योग्य प्रकार रिलीज होऊ शकत नाही. सेरोटोनिन आपल्या झोपेला आणि बॉडी क्लॉकला नियंत्रित करणारे हार्मोन आहेत.

(Image Credit : thejournal.ie)

चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही ट्रिप्टोफेन असलेले खाद्य पदार्थ खाऊ शकता. यासाठी पनीर, बीन्स, भोपळ्याच्या बीयांचा डाएटमध्ये समावेश करा. झोप न येण्याचं मुख्य कारण तणाव हे असू शकतं. तणावामुळे बॉडी क्लॉक योग्य पद्धतीने काम करत नाही. तणावा किंवा स्ट्रेस लेव्हल कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. रोज व्यायाम करणे, सकाळी उठणे, चांगल्या सवयी लावा. 


Web Title: Easy ways to improve your sleep cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.