जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:09 AM2020-01-03T11:09:33+5:302020-01-03T11:18:45+5:30

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्कआउट रूटीन सुरू करणं म्हणजे आव्हान असतं. हे खासकरून त्या लोकांसाठी जास्त आव्हानात्मक असतं ज्यांचं वजन अधिक असतं.

Easy workout and exercise for overweight peoples | जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत

जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत

Next

(Image Credit : dlaignite.com)

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्कआउट रूटीन सुरू करणं म्हणजे आव्हान असतं. हे खासकरून त्या लोकांसाठी जास्त आव्हानात्मक असतं ज्यांचं वजन अधिक असतं. ओव्हरवेट लोकांसाठी वेगवेगळ्या जिममध्ये भरपूर प्लॅन्स असतात. जिममधील इतरांना बघून वर्कआउट शेड्यूल फॉलो करणं जास्त वजन असलेल्यांसाठी त्रासदायक ठरू शकतं.

पण अशा लोकांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, त्यांच्या वर्कआउट करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं शरीरासाठी जेवण. वर्कआउटने त्यांना फिट राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. बऱ्याचदा ओव्हरवेट लोकांना हे कळत नाही की, वर्कआउटची सुरूवात कशी करावी ज्याने त्यांचा स्टॅमिना वाढेल. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर आम्ही तुम्हाला सुरुवात करण्यासाठी काही सोप्या एक्सरसाइज सांगणार आहोत.

१) वॉक

काही महिने किंवा वर्ष शरीर रिलॅक्स असल्यावर तुम्ही त्यावर एकाएकी जास्त लोड देऊ शकत नाही. तुम्ही जर तसं केलं तर वाढलेल्या फॅटमुळे तुम्हाला वर्कआउट करणंही अवघड होऊ शकतं. त्यामुळे सुरूवात रोज ५ ते १० मिनिटे नॉर्मल वॉकने करा आणि हळूहळू चालण्याची गती वाढवा. यानंतर काही दिवसात तुमचं शरीर रनिंगसाठी तयार होईल. 

२) एक्वा जॉगिंग

पाण्यात केली जाणारी अ‍ॅक्टिविटी त्या लोकांसाठी गरजेची असते ज्यांना सांधेदुखीची समस्या असते किंवा ज्यांचं वजन जास्त असतं. यात पाण्यात अ‍ॅक्टिविटी करून भरपूर कॅलरी बर्न करता येतात.

३) ग्रुप एक्सरसाइज

(Image Credit : nbcnews.com)

जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही ग्रुप एक्सरसाइज क्लासेस जॉइन करू शकता. याने तुम्ही नियमित एक्सरसाइज करू लागाल. कारण ग्रुपमध्ये ओळखी होते, मित्र होतात आणि याने रोज एक्सरसाइज करण्याची तुमची इच्छा होईल. यासाठी तुम्ही योगा, भांगडा, किक बॉक्सिंग, झुंबा क्लासेस करू शकता.

४) स्ट्रेन्थ ट्रेनिंग

स्ट्रेन्थ ट्रेनिंग सुरू करण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जास्त वजन असलेल्यांना याचा अधिक फायदा होतो. वजन जास्त असल्याकारणाने शरीराचं पोश्चर बिघडतं. स्ट्रेन्थ ट्रेनिंगने ते योग्य करण्यास मदत मिळते. स्ट्रेन्थ ट्रेनिंग ज्वाइंट्स रेंज ऑफ मोशन वाढवू शकते. आणि जेव्हा मसल्स मजबूत होतात तेव्हा मेटाबॉलिज्मही वाढतं. याने भरपूर कॅलरी बर्न होतात. 

५) क्रॉस ट्रेनर किंवा पोर्टेबल पेडलर

(Image Credit : realhomes.com)

ही सुद्धा कॅलरी बर्न करण्याची सोपी आणि चांगली पद्धत आहे. क्रॉस ट्रेनरचा वापर सोपा असतो आणि यावर स्लो स्पीडमध्ये जास्त वेळ वर्कआउट करू शकता. यात तुम्हाला केवळ पायऱ्या चढत असल्यासारखं वाटतं. जास्त वजन असलेले लोक पायऱ्या चढू शकत नाहीत, त्यामुळे या वर्कआउट मशीनने त्यांना मदत होऊ शकते.


Web Title: Easy workout and exercise for overweight peoples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.