बदाम आणि डाळींब खा, स्वस्थ रहा...वजन कमी करण्याचा अत्यंत सोपा फंडा लक्षात ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 10:06 PM2021-06-10T22:06:00+5:302021-06-10T22:07:57+5:30
वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
वजन वाढल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. वजन वाढल्यामुळे आपण इतर आजारांनाही आमंत्रण देतो. वजन कमी करणे आणि वाढणे हे सर्व आपल्या आहारावर ठरलेले असते. वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
डाळिंबमध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. डाळींब अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्मांनी भरलेले असते. तसेच बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका नसतो. या व्यतिरिक्त, बदामामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते. त्यामुळे बदाम आणि डाळिंब एकत्र करून खावीत.
तसेच आपण यामुळे आपल्याला बराच काळ काहीही खाल्ल्याशिवाय राहु शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप २ डायबेटीसचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर असते. तसेच यामध्ये ग्लूकोजचे प्रमाणही बरेच कमी आहे. त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.
डाळिंबामुळे वजन नियंत्रित होतो, हे बर्याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते.