रोज सफरचंद खाल्ल्यानं डॉक्टर खरंच दूर राहतो का? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:29 PM2021-05-09T19:29:49+5:302021-05-09T19:39:23+5:30

सफरचंद खाण्याचे फायदे काय ? तोटे काय? जाणून घ्या सत्य....

Eat apple a day, keep doctor away; is it true? | रोज सफरचंद खाल्ल्यानं डॉक्टर खरंच दूर राहतो का? जाणून घ्या सत्य...

रोज सफरचंद खाल्ल्यानं डॉक्टर खरंच दूर राहतो का? जाणून घ्या सत्य...

googlenewsNext

'इट अॅपल अ डे, कीप डॉक्टर अवे' (eat apple a day; keep doctor away) हे आपण सर्वांनीच ऐकलं असेल पण यात किती तथ्य आहे? हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे का? आज याच वाक्यातील सत्य-असत्यता काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 
सफरचंद खाण्याचे जसे परिणाम आहेत तसे दुष्परिणामही आहेत. 

चला आधी सफरचंदाचे (apple) फायदे (benefits)काय आहेत ते  पाहुया

मधुमेहाचा धोका कमी करतो- सफरचंद खाल्ल्यामुळे टाईप २ डायबेटीजचा धोका २८ टक्क्यांनी कमी होतो. 

वजन कमी होते- सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने तुमची भूक कमी होते. तसेच यामुळे शरीरात कॅलरी इनटेक कमी होते. त्यामुळे निश्चितच याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

मनावरील ताणतणाव कमी होतो- सफरचंद खाल्ल्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रोजचा ताण काही प्रमाणात कमी होतो.

हृदयासाठी लाभदायक- सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. तसेच सफरचंदामुळे तुमचा रक्तदाबही सुरळीत राहतो.

हे झाले सफरचंदाचे फायदे.

आता तोटे पाहू
जर तुम्ही सफरचंदाचे सेवन जास्त केले तर तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखीसारखे आजार होतात.

जर तुम्ही किटो डाएट करत असाल तर सफरचंद कमी प्रमाणातच खा

Web Title: Eat apple a day, keep doctor away; is it true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.