विसराळूपणा टाळण्यासाठी हे खा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2016 03:26 PM2016-12-11T15:26:39+5:302016-12-11T15:32:14+5:30
आज प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. या व्यस्त आयुष्यात असंख्य कामेही करावी लागतात. मात्र प्रत्येकच काम आपल्या लक्षात राहील याची शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विसरतो.
Next
टोमॅटो - यामध्ये एंटीआॅक्सिडेंट असते. दररोज आहारात सॅलडच्या स्वरुपात खाल्याने तुमची मेमरी चांगली राहते.
मनुके - यामध्ये असलेल्या विटामिन-सी मुळे मेंदू ताजातवाना राहातो. दररोज सकाळी १५-२० मनुके भिजवून खाल्ले तर रक्ताची कमतरता भरुन निघते आणि ह्रदय चांगल्या स्थितीत राहाते.
भोपळ्याच्या बिया - यामध्ये जस्ताचे प्रमाण जास्त असते. जे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले असते.
आॅलिव्ह तेल - याला जेवण बनवताना वापरु शकता. तसेच पोळीवर देशी तुपाऐवजी हे तेल वापरु शकता. हे मेंदूला ऊर्जा देते.
काय टाळाल - जास्तीचे मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड मेंदूवर विपरित परिणाम करतो.