​बीट खा, फिट राहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 06:14 PM2017-01-06T18:14:44+5:302017-01-06T18:14:44+5:30

बीट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अ‍ॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे.

Eat beet, stay fit! | ​बीट खा, फिट राहा !

​बीट खा, फिट राहा !

googlenewsNext
ट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अ‍ॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे. बीट पौष्टिक असल्याने शारीरिक कमजोरी दूर होते शिवाय अन्य रोगांपासूनही मुक्तता मिळते. बीटचा वापर सलादच्या रुपात अधिक केला जातो. एका अभ्यासानूसार लाल बीटमधील भरपूर प्रमाणात असलेल्या नायट्रेटमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे एक असे रसायन आहे जे पचनसंस्थेत पोहचल्यानंतर नायट्रेट आॅक्साइड बनते आणि रक्तप्रवाहास वाढवितो, त्यामुळे रक्तदाब कमी राहतो. हे रसायन मांसपेशींच्या आॅक्सिजनच्या आवश्यकतेलादेखील कमी करतो.  

* बीटच्या रसासोबत गाजरचा रस समभाग मिक्स करून पिल्याने शारीरिक ताकद वाढते, सोबतच मोटापा वाढत नाही आणि चरबी कमी करण्यास मदत होते.

* पानांसोबत खाल्लयाने बीट शरीरात लवकर पचते. बीटच्या पानांचा रस कोमट करुन कानात टाकल्यास कानाचे दुखणे थांबते. तसेच बीटच्या पानांचा रस मधात मिक्स करुन गजकर्णच्या ठिकाणी लावल्यास लवकर बरे होते.

* ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान त्रास होतो, त्यांनी कच्चे बीट जास्त प्रमाणात सेवन करावे. यामुळे दूध आणि रक्त वाढते आणि दरम्यान होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळते.

* बीटच्या १०० गॅम रसात २५ ग्रॅम सिरका मिक्स करुन केसांच्या मुळांना लावल्यास कोंडा नाहीसा होतो शिवाय केसगळती थांबते. 

यकृत रोग व पित्ताशय संबंधी विकारांवर बीटाच्या रसासोबत समभाग गाजर व काकडीचा रस मिक्स करून रोज सकाळ-संध्याकाळ पिल्याने खूपच फायदा होतो.  



 

Web Title: Eat beet, stay fit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.