Sleeping tips: रात्री झोप येत नाहीये? लाल रंगाचं 'हे' छोटंस फळ दूर करेल तुमची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 06:57 PM2022-03-01T18:57:08+5:302022-03-01T18:59:01+5:30
न्युट्रिशनिस्ट रोझी मिलेन यांच्या मते तुमच्या रात्रीच्या झोपेचा संबंध तुम्ही रात्री काय खाता यावर अवलंबून असतो. रोझी यांच्या मते असे काही फुड्स आहेत ज्याचे सेवन पुर्णपणे टाळावे तर असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला चांगली झोप लागू शकते.
अनेकजण असे असतात ज्यांना रात्रीची झोप येणे म्हणजे अत्यंत अवघड असते. कितीवेळा कुस बदलूनही झोप काही येत नाही. न्युट्रिशनिस्ट रोझी मिलेन यांच्या मते तुमच्या रात्रीच्या झोपेचा संबंध तुम्ही रात्री काय खाता यावर अवलंबून असतो. रोझी यांच्या मते असे काही फुड्स आहेत ज्याचे सेवन पुर्णपणे टाळावे तर असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला चांगली झोप लागू शकते.
कॉफी
जर तुम्हाला रात्री शांत झोप यावी असे वाटत असेल तर झोपण्यापुर्वी कॉफी अजिबात पिऊ नका. अनेकांना जेवणानंतर कॉफी पिण्याची सवय असते. पण कॉफी पिल्यानंतर ४ ते ५ तास झोप येत नाही. त्यामुळे रोझी मिलेन असा सल्ला देतात की दिवसा २ वाजल्यानंतर कॉफी पिऊच नये.
चॉकलेट
चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिनमुळे मोलाटोनिन नावाचे हार्मोन रिलिज होण्यास वेळ लागतो. हे हार्मोन आपल्या झोपेसाठी अत्यंत गरजेचे असते.
कोणते पदार्थ खाल्ल्याने शांत झोप येते
तुम्ही रात्री चेरी, बदाम किंवा कॅमोमाइल चहा सेवन करु शकता. यामुळे शांत झोप लागते. चेरीमध्ये मेलाटोनिन असते तसेच बदामामध्ये मॅग्नेशियम यामुळे झोप चांगली लागते. कॅमोमाइल चहामुळे शांत वाटते व झोप लवकर लागते. झोप लागण्यासाठी फायदेशीर पदार्थ...
- अक्रोड
- पांढरा भात
- पॅशनफ्लावर चहा
- कीवी
याशिवाय रात्री मोबाईल, संगणक अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर वेळ घालवणे बंद करावे. यामुळे झोप येण्यास अडचण होते.