चॉकलेट खा, बघा, तुमचा मेंदू कसा फटाफट काम करायला लागेल!
By admin | Published: July 3, 2017 04:11 PM2017-07-03T16:11:22+5:302017-07-03T16:11:22+5:30
तुमची शारीरिक, मानसिक झीजही भरून काढील चॉकलेट!
- मयूर पठाडे
चॉकलेट! व्वा! नुसतं चॉकलेटचं नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं ना! त्यातही हे चॉकलेट जर डार्क चॉकलेट असेल तर मग विचारायलाच नको! पण याच चॉकलेटमुळे दात किडतात, आपलं आरोग्य बिघडतं यासारख्या गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील, पण तुम्ही जर खरोखरच चॉकलेटचे दिवाणे असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे! चॉकलेटमुळे तुमची स्मृती तल्लख होऊ शकते, पाहिलेलं, ऐकलेलं, वाचलेलं, अभ्यासाच्या गोष्टी तुमच्या चांगल्या लक्षात राहू शकतात! एवढंच नाही, तुमचं ज्ञान वाढण्यासाठीही या चॉकलेटचा, अर्थात ज्यापासून हे चॉकलेट बनवतात, त्या कोकोचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो!
यासंदर्भात शास्त्रज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला. त्यातून काढलेला हा निष्कर्ष चॉकलेटप्रेमींसाठी फारच दिलासादायक ठरणार आहे.
काय आहेत चॉकलेट खाण्याचे फायदे?
१- चॉकलेटमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते.
२- अर्थातच त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. अनेक गोष्टी लक्षात ठेवणं सोपं जातं.
३- कोणत्याही गोष्टीवर, अभ्यासावर लक्ष एकाग्र करण्याची तुमची शक्ती, क्षमता वाढते.
चॉकलेटचे फायदे असले तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेतच. त्यामुळे त्याकडेही शास्त्रज्ञांनी सर्वसामान्यांचं लक्ष वेधलं आहे.
चॉकलेटमुळे तुमच्या कॅलरीज वाढतात.
अशा वाढलेल्या कॅलरीज तुमच्या शरीराला घातक असतात.
शिवाय चॉकलेटमुळे दातांना किड लागते, ती वेगळीच.
तर त्याकडेही लक्ष द्या!..