आंबवलेले पदार्थ खा आणि व्हा गोडाच्या व्यसनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:33 PM2017-09-16T14:33:17+5:302017-09-16T14:36:26+5:30

आठवड्याच्या आत साखरेची चटक होऊ शकते कमी

 Eat fermented food and keep away yourself from addiction of sugar | आंबवलेले पदार्थ खा आणि व्हा गोडाच्या व्यसनापासून दूर

आंबवलेले पदार्थ खा आणि व्हा गोडाच्या व्यसनापासून दूर

ठळक मुद्देआंबवलेले पदार्थ जर योग्य प्रमाणात आपल्या खाण्यात असले, तर साखर खाण्याची आपली इच्छा आपोआपच कमी होते.टेन्शनमुळे गोड खाण्याची इच्छा आपोआप वाढते. त्यामुळे आपल्या टेन्शनवरील उपाय आपल्यालाच शोधायला हवा.‘इएफटी’ म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स’ वापरुन आपण साखरेच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतो.

- मयूर पठाडे

आपल्याकडे मधुमेह्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की जागतिक आरोग्य संघटनेनंही त्याबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. अशाच पद्धतीनं भारतात मधुमेह्यांची संख्या वाढली तर संपूर्ण देशापुढेच इतर कोणतही प्रश्नापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न ठरेल, असा इशराही तज्ञांनी वेळोवेळी दिला आहे.
मात्र मधुमेह्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही कोणीच त्याबाबत फारसं गंभीर नाही. सरकार तर नाहीच, पण ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, असे रुग्णदेखील त्याकडे दुर्लक्षच करतात. ‘किरकोळ’ म्हणून सोडून देतात आणि आपली आहे तिच जिवनशैली कायम ठेवतात.
साखरेचं तर आपल्याला कधीच वावडं नव्हतं आणि मधुमेही लोकही ‘एखादवेळी खाल्लं तर काय होतं’ म्हणून त्याकडे अगदीच लाईटली पाहातात. अर्थात त्यामागे गोड खाण्यासाठी, चहा पिण्यासाठीचा आग्रहही कारणीभूत असतो.
पण जास्त गोड पदार्थ आणि साखर कमी करण्याचा प्रयत्न मनापासून केलाच पाहिजे.
त्यासाठी काही सोपे उपायदेखील करून पाहाता येतील.
साखरेपासून दूर राहायचं असेल तर त्यासाठीचा एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे आंबवलेले पदार्थ जर योग्य प्रमाणात आपल्या खाण्यात असले, तर साखर खाण्याची आपली इच्छा आपोआपच कमी होते. मात्र शक्यतो हे आंबवलेले पदार्थ घरीच तयार केलेले असले तर उत्तम. कारण त्यातील घटकांवर आपलं नियंत्रण राहातं.
अभ्यासक सांगतात, अगदी कमीत कमी काळात, म्हणजे अगदी आठवड्याच्या आत तुमची साखरेची चटक यामुळे कमी होऊ शकते.
आपल्याला जर रोजची टेन्शन्स, मोठ्या प्रमाणातील जबाबदाºया आणि त्या वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान.. यासारख्या गोष्टी जर दररोजच तुम्हाला कराव्या लागत असतील, तर टेन्शनमुळेही गोड खाण्याची इच्छा आपोआप वाढते.
आपली टेन्शन्स आपल्यालाच कमी करता येतात. प्रत्येक गोष्टीच्या मागे स्वत:च धावत बसण्यापेक्षा काही गोष्टी इतरांवर सोपवता येतात का याचाही विचार करा. रोजच्या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढा.
ध्यानधारणा, व्यायाम या गोष्टीही आपल्याला यासाठी उपयुक्त ठरू शकतील.
‘इएफटी’ हा आणखी एक उत्तम उपाय आहे. ‘इएफटी’ म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स’. इमोशनल अ‍ॅक्युप्रेशर पॉर्इंट्सच्या साहाय्यानं आपण साखरेच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतो. त्याचाही वापर करून पाहायला हरकत नाही.

Web Title:  Eat fermented food and keep away yourself from addiction of sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.