'हे' आयुर्वेदातील नियम फॉलो केले तर डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:51 AM2019-10-02T09:51:33+5:302019-10-02T09:52:37+5:30
आयुर्वेद केवळ एक चिकित्सा किंवा मेडिकल सायन्स नाहीये. ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे.
(Image Credit : thedoctorweighsin.com)
आयुर्वेद केवळ एक चिकित्सा किंवा मेडिकल सायन्स नाहीये. ही एक निरोगी जीवन जगण्याची कला आहे. ही कला जर तुम्ही अवगत केली तर जीवन निरोगी जगणंही शक्य आहे. आणि तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याचीही गरज पडण्याची शक्यता कमी राहते. यात सांगण्यात आलेले खाण्या-पिण्याचे नियम फॉलो करून तुम्ही एक निरोगी आणि ऊर्जापूर्ण आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम...
काय आणि कधी खावं?
आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच जेवण केलं पाहिजे. कोणतेही पदार्थ एकत्र करून खाणे किंवा ओव्हरइटिंग टाळलं पाहिजे. तिन्ही वेळचं जेवण नियमितपणे आणि योग्य वेळेवर केलं पाहिजे. तुम्हाला जेवण झाल्यावर अवेळी भूक लागली तर फळं खाऊ शकता. फळं आणि हिरव्या भाज्यांचं अधिकाधिक सेवन करावं.
याचा होतो अधिक फायदा
भूक लागल्यावरच जेवण केल्याने अधिक फायदे होतात. आयुर्वेदानुसार, जेव्हा आपण भूक लागल्यावरच जेवण करतो, तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि आपला मूड चांगला राहतो. भूक लागल्यावरच जेवण केल्याने अन्न पचन चांगलं होतं आणि आपलं शरीर मजबूत राहतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आयुर्वेदानुसार, खाण्या-पिण्याचे नियम फॉलो केल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याने नुकसानकारक बॅक्टेरिया आणि कीटाणू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही. आणि आपण कमी आजारी पडतो.
सौंदर्य वाढतं
आपण सर्वच आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि ट्रिटमेंट करत असतो. पण जर केवळ आयुर्वेदानुसार खाणं-पिणं सुरू कराल तर सुंदर त्वचा आणि आकर्षक शरीर कोणत्याही मेहनतीशिवाय मिळवता येऊ शकतं.
मानसिक आरोग्य राहतं चांगलं
जर आपण दिवसातील तिन्ही वेळी योग्य वेळेवर ताजं जेवणं अन्न खाल्लं तर आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपली स्मरणशक्ती चांगली होते आणि रागावरही कंट्रोल ठेवता येतो. अस्वस्थता, चिंता आणि घाबरणं यांसारख्या समस्या आपल्यापासून दोन हात दूर राहतात.
यावेळी अधिक खावं
आयुर्वेदानुसार, आपण भूकेपेक्षा जास्त अन्न खाऊ नये. जेवढी भूक आहे, त्यापेक्षा थोडं कमीच खावं. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित व्हावी. पण जर तुम्हाला कधी जास्त खाण्याचं मन झालं तर दुपारच्या वेळी खावं. सकाळी आणि सायंकाळी हलकं खावं.