भरपूर फायद्यांसाठी उकडूनच खा हे पदार्थ, अनेक आजारांपासून मुक्ती...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:03 PM2021-06-02T20:03:37+5:302021-06-02T20:04:39+5:30
उकडलेले अन्नपदार्थ खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात उकडलेला असेल तर त्याचा फायदाच होतो. आम्ही आता तुम्हाला अशा पदार्थांची यादी देणार आहोत जे उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायदा होतो.
आपल्या आवडीचे पदार्थ तुम्ही खाल्लेच पाहिजेत पण शरीराची काळजी घेण्यासाठी काही आरोग्याला पोषक असे पदार्थही खाल्ले पाहिजेत. शिजवल्यामुळे अन्नपदार्थातील पोषकतत्वे कमी होतात असा समज आहे. तो काहीप्रमाणात खराही आहे. पण तुम्ही उकडलेले अन्नपदार्थ खाऊ शकता. उकडलेले अन्नपदार्थ खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात उकडलेला असेल तर त्याचा फायदाच होतो. आम्ही आता तुम्हाला अशा पदार्थांची यादी देणार आहोत जे उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायदा होतो.
मका (कॉर्न)
मक्याचे अनेक फायदे आहेत. मक्यात व्हिटॅमिन बी असते जे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असते. याशिवाय कॉपर, आयरन, मॅग्नेशियम आणि झिंकही यामध्ये असते. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात.
ब्रोकोर्ली
सध्या अनेकजण ब्रोकोर्लीचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत आहेत. ब्रोकोर्ली उकडून खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. तसेच यात पोटॅशियम, आयरन, व्हिटामिन सी, व्हिटॅमिन के असते.
बटाटा
बटाटे उकडल्यावर त्यातल्या कॅलरीज कमी होतात. तसेच फॅटही कमी होते. तुम्ही उकडलेल्या बटाट्यासोबत टॉमेटो आणि कांदा घालून त्यात चाट मसाला टाकून खाऊ शकता.
उकडलेल्या पदार्थांचे फायदे अनेक आहेत. ते सहज पचतात, त्वचा चमकदार होते, अॅसिडीटी आणि किडीनीच्या विकारांपासून शरीर दूर राहते.