घरचे अन्न खा, मधुमेह टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2016 02:10 PM2016-07-06T14:10:24+5:302016-07-06T19:40:24+5:30
घरचे जेवण केल्यामुळे मधुमेहाचा धोकादेखील कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
आ च्या हातचे अन्न खाण्याचे महत्त्व काही वेगळे सांगायला नको. चवी बरोबरच आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे घरचे जेवण केल्यामुळे मधुमेहाचा धोकादेखील कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळून अधिकाधिक घरचे जेवण घेतले पाहिजे असा सल्ला वैज्ञानिक देत आहेत.
जे लोक सतत बाहेर खातात, विशेष करून फास्ट फूड, त्यांना वजन वाढीची समस्या त्रास देते जे की, टाईप २ मधुमेहाचे कारण बनू शकते. अलिकडे लोकांच्या आहारात ऊर्जेचे प्रमाण जरी अधिक असले तरी पोषक घटकांचा त्यामध्ये अभाव आहे. हेच कारण आहे की, लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणा हे मधुमेहाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, अशी माहिती ‘हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ’ येथील की सुन यांनी दिली.
संशोधनात असे दिसून आले की, जे लोक आठवड्यातून पाच ते सात वेळेस रात्री घरी बनवलेले जेवण करतात त्यांना केवळ दोन पेक्षा कमी वेळेस घरी जेवणाऱ्या लोकांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका १५ टक्क्यांनी कमी असतो. जे लोक दुपारीदेखील घरी बनवलेले अन्न खातात त्यांच्यामध्ये तर टाईप २ मधुमेहाचा धोका आणखी कमी असतो.
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शकतत्त्वामध्ये नियमित व्यायाम आणि सकस-पोषक आहार घेण्यावर भर देण्यात येतो. घरी बनवलेल्या अन्नात असलेले पोषणतत्त्व आणि संतुलित जीवनशैली मधुमेहाला रोखण्यासाठी अतियश मदतपूर्ण ठरते.