हिवाळ्यात हे खा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2016 03:34 PM2016-11-10T15:34:00+5:302016-11-10T15:34:00+5:30
हिवाळ्याला सुरूवात होताच आपण थंडीपासून बचावासाठी स्वेटर, गरम कपडे, शॉल आदी साहित्यांचा वापर करतो. यामुळे शरीराच्या बाह्य अवयवांचे तर संरक्षण होते, मात्र शरीराच्या आतील भागांना ऊर्जा मिळण्यासाठी विचार करायला हवा.
Next
-Ravindra More
हिवाळ्याला सुरूवात होताच आपण थंडीपासून बचावासाठी स्वेटर, गरम कपडे, शॉल आदी साहित्यांचा वापर करतो. यामुळे शरीराच्या बाह्य अवयवांचे तर संरक्षण होते, मात्र शरीराच्या आतील भागांना ऊर्जा मिळण्यासाठी विचार करायला हवा. बऱ्याचजणांना हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा जास्त त्रास होतो. मग या त्रासापासून वाचण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश असावा याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...
संत्री
रसदार संत्र्यात पोषक घटक भरपूर आहेत. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम भरपूर असते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, सल्फर आणि क्लोरिन असते. संत्र्यावरच्या आवरणात सर्वांत जास्त कॅल्शियम असते. म्हणूनच संत्र्याचे सेवन सालासकट करायला पाहिजे. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेट व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते आणि विकारांना दूर करते, तसेच थंडीशी लढायला ऊर्जादेखील मिळते.
पालक
या ऋतूत पालक सहज मिळतो, यामुळे याचे सेवन करणे टाळू नका. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठीचे घटक म्हणजेच लोह आणि पौष्टिक तत्त्वे यात भरपूर प्रमाणात आहेत.
शेंगदाणे
शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक घटक जसे न्यूट्रियन्टस, मिनरल, अॅण्टी-आॅक्सिडेंट आदी घटक शेंगदाण्यामध्ये आढळतात. थंडीत शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळून शरीर गरम राहते. शिवाय प्रोटिन्सदेखील मिळतात. थंडीतील खोकल्यावर शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर असून, फुफ्फुसाला बळ मिळते. थंडीत तळलेले, मीठ लावलेले किंवा साधे शेंगदाणे भरपूर खा. बाजारात मिळणारी चिक्की या दिवसात नेहमी सोबतच ठेवावी.
पेरु
थंडीत ह्रदयाची शक्ती वाढविण्यासाठी पेरुचे सेवन अत्यावश्यक आहे. यास ‘जाम’ किंवा ’अमरूद’ असेही म्हटले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर ‘क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या ‘व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यत: मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. कारण त्यातील ‘क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
गाजर
गाजरामध्ये विटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि के भरपूर प्रमाणात असल्याने ते थंडीपासून लढण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात.
किवी
या फळात विटॅमिन ‘सी’चे प्रमाण भरपूर आहे, जे थंडीत खूप फायदेशीर आहे. शिवाय यातील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील घातक जिवाणूदेखील नष्ट होतात.
कॉफी
कॉफीतील फ्लेवनॉइड घटकामुळे ह्रदयाचे कार्य चांगले चालते आणि त्यामुळे सर्दीचा त्रास होत नाही, शिवाय शरीराला गरमीदेखील मिळते.
सुकामेवा
सुकामेव्यातील पोषक तत्त्वांमुळे शरीराला आतून ऊर्जा मिळते त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी आपल्या सोबत विविध प्रकारच्या सुकामेवांचे मिश्रण बनवून ठेवा आणि त्याला दिवसातून काही तासांच्या फरकाने खावे.
सफरचंद
हिवाळ्यात सफरचंद भरपूर उपलब्ध असतात. विशेष म्हणजे सफरचंदामधील तत्त्वांमुळे कॅन्सर तसेच अन्य कित्येक आजारांपासून मुक्ती मिळते. सफरचंदातील अॅन्टी-आॅक्सिडेंट आणि प्रोटिन्समुळे शरीराला मजबूती मिळते.