​हिवाळ्यात अ‍ॅलर्जीपासून बचावासाठी हे खा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 05:12 PM2016-11-16T17:12:15+5:302016-11-16T17:19:35+5:30

हिवाळा ऋतू तसा हेल्दी मानला जातो, मात्र या ऋतूत अ‍ॅलर्जी होण्याची शक्यताही बळावते. कारण बºयाचजणांना या काळात सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार झालेले असतात. यामुळे अ‍ॅलर्जी कोणालाही होऊ शकते...

Eat it in the winter to avoid allergies | ​हिवाळ्यात अ‍ॅलर्जीपासून बचावासाठी हे खा

​हिवाळ्यात अ‍ॅलर्जीपासून बचावासाठी हे खा

googlenewsNext
वाळा ऋतू तसा हेल्दी मानला जातो, मात्र या ऋतूत अ‍ॅलर्जी होण्याची शक्यताही बळावते. कारण बºयाचजणांना या काळात सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार झालेले असतात. यामुळे अ‍ॅलर्जी कोणालाही होऊ शकते. वेळीच काळजी घेतली नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते. मात्र यादरम्यान खालील पदार्थांचे सेवन केल्यास आपली अ‍ॅलर्जीपासून सुटका होऊ शकते. 

* हळद-
हळद मध्ये अ‍ॅन्टी आॅक्सिडेंटचे गुण असतात. याकाळात हळदीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. रोज हळद आणि दूध पिल्याने आपणास कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होणार नाही. 

* आले (अद्रक)-
आल्यामध्येही अ‍ॅन्टीआॅक्सिडेंटचे गुण असल्याने याच्या सेवनाने अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. आले आपण स्वयंपाकात किंवा चहात मिक्स करु न घेऊ शकता. 

* लसूण-
या काळात लसणाच्या रोज दोन कळ्या खाव्यात. यातील गुणकारी घटकामुळे आपला कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. 

* लिंबू- 
लिंबाच्या सततच्या सेवनाने त्यातील ‘व्हिटॅमिन सी’मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, यामुळे अ‍ॅलर्जीपासून लढायला मदत होते. आहारात किंवा पाण्यात लिंबूरस मिसळून घेऊ शकता. 

* सफरचंद 
सफरचंदामधील केर्स्टिनच्या गुणधर्मामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपला कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. म्हणून या ऋतून रोज किमान एक सफरचंद खावे.

Web Title: Eat it in the winter to avoid allergies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.