हेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:28 PM2018-12-10T16:28:00+5:302018-12-10T16:29:01+5:30

फ्रेंच फ्राइज म्हणजे जंक फूडमध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा पदार्थ. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. परंतु जास्त प्रमाणात याचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं.

Eat only 6 french fries to keep yourself healthy | हेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा!

हेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा!

googlenewsNext

फ्रेंच फ्राइज म्हणजे जंक फूडमध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा पदार्थ. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. परंतु जास्त प्रमाणात याचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. कारण यामध्ये मीठ आणि तेलाचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर अनेक रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्समध्ये ताज्या फ्राइज सांगून फ्रोजन फ्राइज सर्व्ह करण्यात येतात. हे फ्रोजन फ्राइज आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. 

तुम्हीही फ्राइज फ्रिक असाल तर हे यापासून लांब राहणं फार अवघड असतं. पण तुम्ही हे खाणं नक्कीच कमी करू शकता. हार्वर्ड यूनिवर्सिटीचे प्रोफेसर टी.एच.चैन यांनी फक्त 6 फ्रेंच फ्राइझ तुम्हाला हेल्दी बनवण्यासाठी मदत करतात असं सांगितलं आहे. तसेच त्यांनी हेदेखील सांगितले की. या 6 फ्राइज जर सलाडसोबत खाल्या तर हे कॉम्बिनेशन न्यूट्रिशन बॅलेन्स करण्यासाठी मदत करतं. 

बटाटा आहे हेल्दी

बटाटा अनहेल्दी नसून हेल्दी असतो. परंतु तुम्ही तो कशाप्रकारे खाताय यावर ते अवलंबून असतं. एक प्लेट फ्रेंच फ्राइजमध्ये जवळपास 200 कॅलरीज असतात. तसेच यामध्ये असलेलं स्टार्च आणि जास्त मीठ ब्लड प्रेशर आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी घातक ठरतं. 

बेकिंग किंवा एयरफ्राय काय आहे उत्तम पर्याय?

फ्रेंच फ्राइज फ्राय करण्यासाठी अनेक लोक बेक किंवा एयरफ्राय करतात. परंतु, ही प्रोसेस फ्राइजमधील कॅलरीज कमी करण्यासाठी मदत तर करतात. परंतु ते खाल्याने शरीराला होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. 

रताळं ठरतं आरोग्यदायी

फ्रेंच फ्राइज किंवा बटाट्याऐवजी रताळं खाणं आरोग्यदायी ठरतं. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर जास्त असतं. तेच कॅलरीजचे प्रमाण बटाट्यापेक्षा कमी असते. 

Web Title: Eat only 6 french fries to keep yourself healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.