पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 10:26 AM2018-11-17T10:26:16+5:302018-11-17T10:27:18+5:30

झोपण्याच्या दोन तासांआधी रात्रीचं जेवण करावे किंवा काही खाल्ल्यावर लगेच झोपू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात असं मत अनेकांचं असतं.

Eat paneer at night before sleep controls weight | पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?

पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?

googlenewsNext

झोपण्याच्या दोन तासांआधी रात्रीचं जेवण करावे किंवा काही खाल्ल्यावर लगेच झोपू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात असं मत अनेकांचं असतं. कारण झोपण्याआधी काही खाल्लं तर वजन वाढतं. या वजन वाढण्याच्या भीतीमुळे अनेक लोक हाय कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळतात. जे चुकीचं आहे. आता आम्ही अशा एका पदार्थाबाबत सांगणार आहोत, ज्याचं सेवन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केल्यास वजन वाढत नाही तर फॅट बर्न होतात. आणि हा पदार्थ खाण्यासाठीही स्वादिष्ट आहे. हा पदार्थ आहे अनेकांचा आवडता पदार्थ पनीर. 

वजन कमी करण्यासाठी पनीर

वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या दोन्ही गोष्टी व्यक्तीच्या मेटाबॉलिज्मवर अवलंबून असतात. त्यामुळे गरजेचं नाहीये की, दोन व्यक्तींचं वजन एकप्रकारेच आणि एकाचवेळेत कमी होईल. जे लोक वजन कमी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत आणि मेहनत करुनही वजन कमी करु शकत नाहीयेत. त्यांच्यासाठी पनीर योग्य पर्याय आहे. अमेरिकेलीत एका यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, झोपण्याआधी पनीर खाल्लाने मेटाबॉलिज्म स्तर वाढतो. याने वेगाने फॅट बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

झोपण्याआधी खावे पनीर

हा अभ्यास १० महिलांवर करण्यात आला. त्यांना वजन कमी करण्याच्या आव्हानात सहभागी व्हायचं होतं. दरम्यान या महिलांची झोपण्याआधीची स्थिती आणि झोपून उठल्यानंतरच्या ऊर्जा याची तपासणी केली गेली. या महिलांना झोपण्याच्या ३० ते ६० मिनिटेआधी पनीरचे काही तुकडे खायला दिले गेले. जेव्हा या महिला झोपून उठल्या तेव्हा त्यांची ऊर्जा जास्त होती. तसेच मेटाबॉलिज्मचा स्तरही वाढला आणि फॅट बर्न क्रियाही वेगाने झाली. 

मेटाबॉलिज्म स्तर वाढवून फॅट बर्न करतं पनीर

असं होण्याचं कारण म्हणजे पनीरमध्ये कॅसीन हे महत्त्वाचं प्रोटीन असतं. हे प्रोटीन वेगवेगळ्या प्रोटीन पेयांमध्येही येतं. याने मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो आणि फॅटही वेगाने बर्न होतात. पनीर एक लो फॅट चीज आहे, जे वजन वाढवत नाही तर कमी करतं. जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्याच्या नादात चीज म्हणजेच पनीरचं अजिबातच सेवन करत नाहीत. अशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण पनीर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आता वजन कमी करायचं असेल तर बिनधास्त पनीर खावं. 
 

Web Title: Eat paneer at night before sleep controls weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.