पास्ता खा, वाढते वजन घटवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2016 09:08 AM2016-07-06T09:08:20+5:302016-07-06T14:38:20+5:30

एका संशोधक गटाने केलेल्या नव रिसर्चनुसार, पास्ता आपले वजन वाढवत नाही तर उलट घटविण्यास मदत करतो.

Eat pasta, increase weight loss | पास्ता खा, वाढते वजन घटवा

पास्ता खा, वाढते वजन घटवा

googlenewsNext
ालियन खाद्यपदार्थ संपूर्ण जगभरात चवीने खाल्ले जातात. पिझ्झा, पास्ता, स्फगेटी अशी नावे घेतली की, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. परंतु पास्ता खाणे म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण देण्यासारखे असता प्रचलित समज आहे. म्हणून अनेक लोक मन मारून पास्ता खाणे टाळतात. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

एका संशोधक गटाने केलेल्या नव रिसर्चनुसार, पास्ता आपले वजन वाढवत नाही तर उलट घटविण्यास मदत करतो. इटलीचा पारंपरिक खाद्यपदार्थ पास्ता आपला ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) कमी करतो. त्याबरोबरच लठ्ठपणा आणि कंबरेचा घेर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

‘आयआरसीसीएस न्युरोमेड इन्स्टिट्यूट’चे संशोधक जॉर्ज पौनिस यांनी माहिती दिली की, आम्ही गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, जे लोक स्वत:च्या गरजेनुसार पास्ता खातात त्यांचा हेल्दी बीएमआय, पोटावरील चरबी कमी आणि कंबर-नितंब गुणोत्तर उत्तम असते.

तसे पाहिले गेले तर भूमध्यप्रदेशातील खाद्यपदार्थ हे सर्वोत्त्कृष्ट आहारांपैकी एक आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून पास्ताविषयी अनेक गैरसमज पसरले. ते खोडून काढत प्रस्तूत संशोधनात वजन नियंत्रणात पास्ता किती महत्त्वाचा आहे यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी संशोधकांनी २३ हजार लोकांचा अभ्यास केला.

Web Title: Eat pasta, increase weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.