भात खा आणि मस्त, मजेत जगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:53 PM2017-08-12T16:53:49+5:302017-08-12T16:55:42+5:30

भात तुमच्या शरीराला किती उपयुक्त आहे, माहीत आहे?.. हे घ्या भाताचे ११ फायदे..

Eat rice and keep yourself healthy, fit.. | भात खा आणि मस्त, मजेत जगा..

भात खा आणि मस्त, मजेत जगा..

Next
ठळक मुद्देभातात जीवनसत्त्वांचा भरपूर साठाएनर्जी सोअर्स म्हणून उपयुक्तहाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींसाठी वरदानत्वचेसाठीही भात खूपच उपयुक्त

- मयूर पठाडे

भातामुळे, त्यातही ब्राऊन राईसमुळे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत, ते आपण पाहिलं. भातामुळे वजनवाढीवर कंट्रोल राहतो हेदेखील आपण लक्षात घेतलं.
पण भाताचे आणखी बरेच फायदे आहेत.
काय आहेत ते? त्याविषयी जाणून घेऊ या.
एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा. नुसत्या भातापेक्षा ब्राऊन राईस जर आपण खाल्ला तर आपल्या आरोग्यासाठी तो जास्त फायदेशीर आहे.
त्यामुळे भाताच्या रंगावर जाण्यापेक्षा, त्यातल्या गुणांकडे बघा आणि ब्राऊन राईसचा जास्तीत जास्त वापर करा.

भाताचे फायदे
१- भात म्हणजे एनर्जी सोअर्स आहे. शरीराला झटकन एनर्जी मिळवून देण्याची क्षमता त्यात आहे.
२- भातात कोलेस्टोरॉल आणि सोडियम नसलं तरी कार्बोहायड्रेट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. शरीराला ऊर्जा मिळवून देण्यात त्याचा वाटा खूप मोठा असतो.
३- आपलं शरीर आणि व्यवस्थित चालण्यासाठी, तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंधन म्हणून ते कार्य करतं.
४- ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंटही भातामुळे उत्तम राखलं जाऊ शकतं. भातात सोडियमचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन आहे, अशा व्यक्तींना तर भात वरदानच ठरू शकतो.
५- भातामध्ये अविद्राव्य फायबर्स असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्याची क्षमता त्यात आहे.
६- आपल्या त्वचेसाठीही भात खूपच उपयुक्त आहे. तांदळाची पावडर आपल्या त्वचेसाठी लाभदायी ठरू शकते.
७-विस्मृतीचा धोका भातामुळे कमी होतो. अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी भाताचा उपयोग होतो.
८- आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी, त्याचबरोबर लघवीचं प्रमाण वाढवण्यासाठी भाताचं महत्त्व आहे.
९- जीवनसत्त्वांचा भरपूर साठा भातात असतो. ड जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोह, फायबर्स इत्यादि घटक भातात मोठ्या प्रमाणात असतात.
१०- हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी भाताच उपयोग होतो.
११- भातात असलेल्या अविद्राव्य फायबर्सचा उपयोग मऊ स्पंजसारखा होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे विकार लांब राहण्यास भातामुळे मदत होते.
 

Web Title: Eat rice and keep yourself healthy, fit..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.