शरीरात रक्त वाढण्यासोबतच वजनही होईल कमी, रोज रिकाम्या पोटी खा भिजवलेले चणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:01 PM2024-07-25T15:01:56+5:302024-07-25T15:05:40+5:30

Soaked Gram Benefit: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल तर अनेक समस्या दूर होतील. अशात रात्री चणे भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. 

Eat soaked chana every morning on an empty stomach blood will be formed quickly | शरीरात रक्त वाढण्यासोबतच वजनही होईल कमी, रोज रिकाम्या पोटी खा भिजवलेले चणे!

शरीरात रक्त वाढण्यासोबतच वजनही होईल कमी, रोज रिकाम्या पोटी खा भिजवलेले चणे!

Soaked Gram Benefit:  जास्तीत जास्त लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले वेगवेगळे धान्य खात असतात. यातीलच एक धान्य म्हणजे चणे. बरेच लोक सकाळी भिजवलेले चणे खातात. भिजवलेले चणे खाणं आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. या चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि सोडिअमसारखे पोषक तत्व आढळतात. तसे तर चणे कोणत्याही पद्धतीने खाणं फायदेशीरच असतं. पण सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल तर अनेक समस्या दूर होतील. अशात रात्री चणे भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. 

पचनक्रिया सुधारते

रोज सकाळी भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. कारण चण्यांमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास सहज मदत मिळते. जर तुम्हाला पचनासंबंधी काही समस्या असेल तर भिजवलेले चणे खाऊ शकता.

हार्ट हेल्थ सुधारते

भिजवलेले चणे खाल्ल्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं चण्यातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही हृदयासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला हृदयासंबंधी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज भिजवलेले चणे खावे.

वजन कमी होतं

वजन कमी करण्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय मानला जातो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या चण्यांचं सेवन करा. चण्यांमध्ये फायबर भरपूर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतं. चण्यांनी पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात तुम्हाला लवकर भूक लागणार नाही.

दूर होईल कमजोरी

शारीरिक कमजोरी जाणवणाऱ्या लोकांना काळे चणे भिजवून खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यात कॅल्शिअम, फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं. तसेच यात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही असतं जे पावसाळ्यात शरीराला भरपूर एनर्जी देतात. तसेच याने इम्यून सिस्टीमही मजबूत होतं.

हीमोग्लोबिन वाढतं

भिजवलेले चणे नियमित खाल्ल्याने शरीरात रक्त वाढतं. आयर्न यात भरपूर असल्याने हीमोग्लोबिन लेव्हलही बूस्ट होते. याच कारणाने व्हेजिटेरिअन लोकांसाठी चणे खूप फायदेशीर ठरतात. रोज एक वाटी भिजवलेले चणे खाऊन तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं.

त्वचा आणि केस राहतील हेल्दी

आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. अशात रोज भिजवलेले चणे खाल्ले तर त्वचा आणि केसांना भरपूर फायदे मिळतात. त्वचा नॅचरल पद्धतीने ग्लोईंग बनते आणि कमजोर केस मजबूत होतात.

Web Title: Eat soaked chana every morning on an empty stomach blood will be formed quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.