स्मरणशक्ती, मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी भिजवून खा 'हे' ड्राय फ्रूट, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:56 PM2024-08-31T12:56:44+5:302024-08-31T13:00:43+5:30

Soaked Walnuts Benefits : बदामाशिवाय आणखी एक असं ड्राय फ्रूॉ आहे जे भिजवून खाल्ल्याने खूप फायदा मिळतो. हे ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्याने मेंदुची काम करण्याची क्षमता अधिक वाढते.

Eat soaked walnuts in morning to get sharp memory and brain power | स्मरणशक्ती, मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी भिजवून खा 'हे' ड्राय फ्रूट, फायदे वाचून व्हाल अवाक्...

स्मरणशक्ती, मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी भिजवून खा 'हे' ड्राय फ्रूट, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Soaked Walnuts Benefits : भरपूर लोक शरीराला अनेक पोषक तत्व मिळावे म्हणून भिजवलेले बदाम खातात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने बदामाचे शरीराला जास्त फायदे मिळतात असं मानलं जातं. मात्र, बदामाशिवाय आणखी एक असं ड्राय फ्रूट आहे जे भिजवून खाल्ल्याने खूप फायदा मिळतो. ज्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. 

हे ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्याने मेंदुची काम करण्याची क्षमता अधिक वाढते. सोबतच स्मरणशक्तीही खूप वाढते. मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही अक्रोड भिजवून खाऊ शकता. रात्रभर एक वाटी पाण्यात २ अक्रोड भिजवून ठेवा. सकाळी हे अक्रोड रिकाम्या पोटी खावेत.

अक्रोडमधील पोषक तत्व

अक्रोडमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, यात आयर्न, पोटॅशिअम, फायबर, झिंक, कॉपर यांसारखे पोषक तत्व असतात. जे तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करण्यास, वजन कमी करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. 

वाढेल मेंदुची क्षमता

अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं. कारण यात मेंदुसाठी आवश्यक ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर असतं. या फूडच्या सेवनाने मेंदुची काम करण्याची क्षमता वाढते आणि मेंदुचा विकासही होतो. यातील फॅट्समुळे स्मरणशक्तीही वाढते.

टाइप २ डायबिटीस

अक्रोडमुळे इन्सुलिन सेंसिटिव्हिटीमध्ये सुधारणा होते. यामुळे टाइप २ डायबिटीसचे रूग्ण याचं सेवन करू शकतात. भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते. यात हेल्दी फॅट, फायबर आणि प्रोटीन असतं जे ब्लड फ्लोमध्ये ग्लूकोज मिक्स होण्याचा वेग कमी करतं.

कोलेस्ट्रॉल निघेल बाहेर

भिजवलेले अक्रोड शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे आपोआप हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच याने शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. 

आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं

अक्रोडमध्ये असे काही अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे सेल्स डॅमेज होण्यापासून रोखतात आणि म्हातारपणी होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच याच्या सेवनाने आतड्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. यातील फायबरमुळे पचन तंत्र मजबूत होण्यास मदत मिळते.

Web Title: Eat soaked walnuts in morning to get sharp memory and brain power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.