कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी खा सूर्यफुलाच्या बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:06 PM2024-07-24T13:06:59+5:302024-07-24T13:07:42+5:30

Sunflower Seeds Benefits: अनेक रिसर्चमधून यातील औषधी गुणांबाबत खुलासा झाला आहे. ज्यांनी शरीराला अनेक लाभ मिळतात. चला तेच जाणून घेऊया.

Eat sunflower seeds to reduce cholesterol, read the benefits of its | कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी खा सूर्यफुलाच्या बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्...

कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी खा सूर्यफुलाच्या बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Sunflower Seeds Benefits: सूर्यफूल फक्त दिसायलाच सुंदर नाही तर आरोग्यासाठीही अनेक दृष्टीने महत्वाचं असतं. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक औषधी गुण असतात. अनेक रिसर्चमधून यातील औषधी गुणांबाबत खुलासा झाला आहे. ज्यांनी शरीराला अनेक लाभ मिळतात. चला तेच जाणून घेऊया.

सूर्यफुलाच्या बियांमधील पोषक तत्व

सूर्यफुलाच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात. तसेच या बियांमध्ये फ्लेवोनॉइड, पॉलीसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅंसिड आणि व्हिटॅमिन असतात. जे हृदयासंबंधी आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. 

बॅड कॉलेस्ट्रोल कमी होतं

सूर्यफुलाच्या बियांच्या माध्यमातून शरीरातील बॅड कॉलेस्ट्रोलची लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते. या बियांमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असतं जे ब्लड वेसेल्ससाठी फायदेशीर असतं. याने हाड ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोका कमी होतो.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी

सूर्यफुलाच्या बियांचं सेवन महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत करतात.सूर्यफुलाच्या बियांमध्ये लिगनेन असतं, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. लिगनेन एकप्रकारचं पॉलीफेनोल असतं जे शरीरात अ‍ॅंंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं.

मानसिक आरोग्य चांगलं राहतं

मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी सूर्यफुलाच्या बीया कामात येऊ शकतात. या बियांमध्ये कॅल्शिअम व झिंकसारखे पोषक तत्व असतात. जे मेंदुच्या विकासात फायदेशीर असतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये आयर्न, झिंक, कॅल्शिअम असतं. जे हाडांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतं. 

Web Title: Eat sunflower seeds to reduce cholesterol, read the benefits of its

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.