वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर खा 'ही' भाजी, जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 10:22 AM2019-06-11T10:22:31+5:302019-06-11T10:32:41+5:30

वजन कमी करायचं असेल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर ही भाजी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

Eat Taro or Colocasia Esculenta lose weight know more benefits | वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर खा 'ही' भाजी, जाणून घ्या फायदे!

वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर खा 'ही' भाजी, जाणून घ्या फायदे!

googlenewsNext

अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबर्‍याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. यासोबतच अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. चला जाणून घेऊ अळीचे फायदे...

अळू आहे खास

अळूला आय़ुर्वेदात खास मानलं गेलं आहे. अळूचे कंदही लोक भाजी म्हणून खातात. तसेच पानेही फार स्वादिष्ट आणि पोष्टीक असतात. वेगवेगळ्या आजारांवरही अळूची पाने औषधी म्हणून वापरली जाते.

अळूमध्ये असलेली पोषक तत्त्वे

अळूची भाजी आठवड्यातून २ ते ३ वेळा खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. कारण यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात.  १ कप अळूमध्ये(साधारण १३० ग्रॅम) केवळ १८७ कॅलरी असतात. तसेच यात ६.७ ग्रॅम फायबर, मॅग्नीज, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं.

हाय फायबर सोर्स

अळूमध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. १ कप उकडलेल्या अळूच्या कंदामध्ये ९ ग्रॅम फायबर असतं. जास्त प्रमाणात लोक फार कमी प्रमाणात फायबरचं सेवन करतात. ज्यामुळे त्यांना डायबिटीस, अपचन, पोटदुखी या समस्यांचा सामना करावा लागतो आणि लठ्ठपणाही वाढतो. फायबरमुळे विष्ठा मुलायम होते आणि आतड्यांना चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्यासही मदत करतं.

वजन कमी करण्यास फायदेशीर

जर तुम्ही लठ्ठपणामुळे किंवा वाढलेल्या वजनामुळे हैराण असाल तर तुम्ही अळूची भाजी आवर्जून खायला हवी. अळूमध्ये डायट्री फायबर असतं, जे फॅट बर्न करण्यास शरीराची मदत करतं. त्यामुळे अळू वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. वजन वाढल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो, त्यामुळे वजन कमी करणं गरजेचं असतं. 

कमी करा कोलेस्ट्रॉल

अळूची भाजी खाल्ल्याने तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होणार नाही, कारण अळूने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी केले जातात. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आठवड्यातून ३ ते ४ वेळा अळूची भाजी खा, याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर हृदयरोगांचा धोका वाढतो. त्यामुळे अळूची भाजी खाऊन तुम्ही हृदयरोगांनाही दूर ठेवू शकता.

ब्लड प्रेशर करा कंट्रोल

अळूची भाजी खाल्ल्याने तुमचं ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. कारण अळूमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. केवळ कप उकडलेल्या अळूमध्ये ३२० मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पोटॅशिअमयुक्त आहार घेतल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

Web Title: Eat Taro or Colocasia Esculenta lose weight know more benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.