हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी खा ही लाल फळं, टळेल हार्ट अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:07 IST2024-08-08T11:46:16+5:302024-08-08T12:07:30+5:30
Red Fruits for Heart blockage : तुम्ही रोज काही लाल फळांचं सेवन केलं पाहिजे. लाल रंगाच्या फळांमुळे हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होण्याास मदत मिळते.

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी खा ही लाल फळं, टळेल हार्ट अटॅक
Red Fruits for Heart blockage : हृदयाच्या नसा ब्लॉक होणं ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हृदयाची काम करण्याची क्षमता स्लो होते. याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव दिसून येतो. हार्ट ब्लॉकेज होण्यामागे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने न होणं हे कारण आहे. जर तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक होऊ द्यायच्या नसेल किंवा ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करायच्या असेल तर हेल्दी आहार घेणं महत्वाचं आहे. सोबतच तुम्ही रोज काही लाल फळांचं सेवन केलं पाहिजे. लाल रंगाच्या फळांमुळे हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होण्याास मदत मिळते.
चेरी हृदयासाठी फायदेशीर
हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी तुम्ही चेरीचं सेवन करू शकता. एक कप चेरीमध्ये साधारणपणे २६० मिलीग्रॅम पोटॅशिअम, लो सोडिअम आणि हाय प्लांट स्टेरोल असतं. एक्सपर्ट सांगतात की, जास्त प्रमाणात पोटॅशिअम आणि कमी सोडिअम असलेल्या पदार्थांचं सेवन करून ब्लड प्रेशर आणि हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर केली जाऊ शकते.
डाळिंब
हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी डाळिंबाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. डाळिंबाच्या रसामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. एक्सपर्टनुसार बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्याने शरीराचं नुकसान होतं. अशात डाळिंबाच्या रसाचं सेवन कराल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल. तसेच याने हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरची समस्याही कमी केली जाऊ शकते.
सफरचंद हृदयासाठी फायदेशीर
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. याने हाय ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो. यात असं फायबर असतं जे हृदयासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं.