ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 08:13 PM2021-05-23T20:13:48+5:302021-05-23T20:24:32+5:30

आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

Eat these five fruits, increase the oxygen level in the body! | ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

googlenewsNext

कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर होतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची योग्य पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 


अननस
अननसमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, थायमिन या सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. अननसात ब्रोमिलेन एन्झाइम असते. हे पाचन समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. अननस खाल्ल्याने आतडेही निरोगी राहतात. अननसामध्ये लोह असते जे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. तसेच लोहामुळे शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.


पपई
पपई हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ए, बी व सी सारखी जीवनसत्त्वांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत होते. तसेच पपईमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कच्ची पपईचा उपयोग सलाड बनवण्यासाठी केला जातो. पपईच्या बियांचे खूप औषधी फायदे आहेत.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी
रक्तात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास ब्लूबेरी फार मदत करते. यात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, सी असते. हे सर्व घटक शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन यासह अनेक पौष्टिक घटक असतात. जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करतात.

केळी
केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात अल्काइन असते. तसेच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. केळी खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. केळ्यात पोटॅशियम, फॉलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळ्यात १०० कॅलरी उर्जा असते.


किवी
किवीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. म्हणून, सध्याच्या काळात डॉक्टर लोकांना किवी खाण्याचा सल्ला देत आहेत. किवीचा रस शरीरातील पचन क्रिया सुधारण्याचे काम करते. हे पोटा संबंधित समस्या दूर करते तसेच बद्धकोष्ठतेतून आराम मिळतो. आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता.

Web Title: Eat these five fruits, increase the oxygen level in the body!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.