डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:59 AM2018-08-21T10:59:34+5:302018-08-21T10:59:51+5:30
डोळे चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या आहारातच असे अनेक पदार्थ असतात जे तुमच्या शरीरासोबतच तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवतात.
(Image Credit : faadustory.com)
डोळे चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या आहारातच असे अनेक पदार्थ असतात जे तुमच्या शरीरासोबतच तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवतात. त्यामुळे तुम्ही आहारात काय घेता याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे. चला आम्ही तुम्हाला काही पौष्टीक गोष्टींबाबत सांगत आहोत ज्यांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांना चांगलं ठेवू शकता.
गाजर : तुम्हाला आठवत असेल की तुमच्या बालपणी घरातील मोठे लोक तुम्हाला गाजर खाण्यासाठी सांगत असत. याचं कारण हेच होतं की, गाजर हे डोळ्यांसाठी फार फायदेशीर असतात. त्यामुळे गाजराचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. गाजरामध्ये ए, बी, सी, डी, ई, जी आणि के हे व्हिटॅमिन्स अधिक प्रमाणात असतात. यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात.
हिरव्या पालेभाज्या : लूटीन आणि जियाक्सथीन आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असतात. आणि याचं प्रमुख स्त्रोत हे हिरव्या भाज्या असतं. याने आपल्या डोळ्यांना शक्ती मिळते आणि डोळ्यांची दृष्टीही चांगली होते.
बदाम : बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन इ असतं. हे तत्व आपल्या डोळ्यांसाठी फार फायदेशीर असतं.
अंडी : अंड्यांमध्ये लूटीन, जियाक्सथीन आणि झिंक अधिक प्रमाणात आढळतात. जे आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
जांभुळ : जांभळांमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. याने मोतिबिंदूसारखी समस्या होण्याची शक्यता कमी असते.