नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल मुळापासून दूर करतील हे उपाय, एकदा करा आणि हार्ट अटॅक टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:23 PM2023-09-16T17:23:43+5:302023-09-16T17:33:44+5:30

Bad Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त झाल्याने नसा ब्लॉक होतात. ज्याने हार्ट अटॅकसारखी गंभीर समस्या निर्माण होते.

Eat these foods to cut bad cholesterol unclog arteries and reduce risk of heart attack | नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल मुळापासून दूर करतील हे उपाय, एकदा करा आणि हार्ट अटॅक टाळा!

नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल मुळापासून दूर करतील हे उपाय, एकदा करा आणि हार्ट अटॅक टाळा!

googlenewsNext

Bad Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) हा शब्द आता सर्वांनाच परिचीत झाला आहे. कारण हे शरीरात वाढल्यावर काय होतं अनेकांना माहीत आहे.  कोलेस्ट्रॉल एक असा चिकट पदार्थ आहे ज्याचं प्रमाण शरीरात जास्त झालं तर हृदयासंबंधी आजारांचा धोका निर्माण होतो.

शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त झाल्याने नसा ब्लॉक होतात. ज्याने हार्ट अटॅकसारखी गंभीर समस्या निर्माण होते. अशात कोलेस्ट्रॉक कमी करणं किंवा वाढू न देणं हा एक महत्वाचा उपाय आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचा वापर डाएटमध्ये करून तुम्ही तुमचं वजनही कमी करू शकता आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलमध्ये बदल आणू शकता.

ऑलिव ऑइल - दिवसातून दोन चमचे ऑलिव ऑइलचा वापर केल्यास एलडीएलचं प्रमाण शरीरात कमी होऊ शकतं. सोबतच यात अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असल्याने याचे वेगवेगळे फायदेही आरोग्याला होतात.

नट्स - ज्या पदार्थांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतं त्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत मिळते. हे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड नट्स आणि बदामात जास्त प्रमाणात असतं.

लसूण - लसणाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत मिळते. आयुर्वेदातही हा सर्वात चांगला  उपाय मानला आहे. लसणाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो. दिवसातून २ ते ४ लसणाच्या कळ्या खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं. 

भेंडी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी

भेंडीची भाजी तर अनेकांना आवडते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. त्यासोबतच यात पेक्टिनही आढळतं. ज्याच्या मदतीने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ लागतं. यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रित राहतं. हे लक्षात ठेवा की, हाय कोलेस्ट्रॉलला अनेक आजारांचं मूळ मानलं जातं.

Web Title: Eat these foods to cut bad cholesterol unclog arteries and reduce risk of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.