या फळांची साल फेकण्याची करू नका चूक, शरीराला मिळणार नाही पूर्ण पोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:44 PM2022-12-03T12:44:58+5:302022-12-03T12:45:37+5:30
Fruit With Peels: काही फळांच्या सालींमध्येच जास्त पोषक तत्व असतात. अशा फळांवरील साल काढणं म्हणजे चूक ठरेल. चला जाणून घेऊ कोणत्या फळांची साल काढू नये.
Fruit With Peels: फळांचे आरोग्याला होणारे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. फळांमधून आपल्या व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबरसारखे पोषक तत्व मिळतात. फळं खाणं जेवढं गरजेचं आहे तेवढीच फळं खाण्याची पद्धत जाणून घेणं महत्वाचं आहे. जर फळं चुकीच्या पद्धतीने खाल्ली गेली तर पूर्ण पोषण मिळत नाही. काही लोक फळं सोलून खातात खातात. हे पपई आणि कलिंगडासारख्या फळांसाठी ठीक आहे. पण काही फळांच्या सालींमध्येच जास्त पोषक तत्व असतात. अशा फळांवरील साल काढणं म्हणजे चूक ठरेल. चला जाणून घेऊ कोणत्या फळांची साल काढू नये.
कीवी (Kiwi)
कीवी फारच आरोग्यदायी फळ आहे. याच्या सालीमध्येही पोषक तत्व असतात. कीवीची साल टणक असते. त्यामुळे अनेक लोक ती काढून टाकतात. याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन आणि अनेक मिनरल्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
चीकू
जास्तीत जास्त लोक चीक्कू सोलून खाणं पसंत करतात. पण याची साल काढणं अवघड असतं. तरीही लोक विचार करतात की, साल खाऊन काही मिळणार नाही. त्यामुळे लोक साल काढून फेकतात. पण चीकूच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्व असतात. अनेक आजारांवर चीकूची साल फायदेशीर मानली जाते.
पेर
पेर हे फळं लोक फार आवडीने खातात. या फळाची साल खाणंही फार गरजेचं असतं. पेरच्या सालीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पेरची साल हार्टसाठीही फायदेशीर असते.
सफरचंद
सफरचंद तर जवळपास सगळयाच आजारांमध्ये खाल्लं जातं. अनेक लोक सफरचंदाची साल काढून खातात. पण असं करणं चुकीचं आहे. सफरचंदाच्या सालीमधील पोषक तत्व ब्लड सर्कुलेशन चांगलं करण्यास मदत करतात. सफरचंदाची साल हार्टसाठीही फायदेशीर असते.