जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी रोज खा 'हे' फूड्स, त्वचा होईल तजेलदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:56 PM2024-05-13T12:56:13+5:302024-05-13T12:56:35+5:30

नेहमी तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल.

Eat these things regularly you will remain young for long time | जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी रोज खा 'हे' फूड्स, त्वचा होईल तजेलदार!

जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी रोज खा 'हे' फूड्स, त्वचा होईल तजेलदार!

बरेच लोक जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. कुणाला यातून फायदा मिळतो तर कुणाला नाही. तुम्हालाही जर नेहमीच तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. यातून तुमच्या शरीराला पोषण मिळेल आणि तुमची त्वचा आतून सुंदर होईल.

एक्सपर्ट सांगतात की, जर त्वचा आतूनच निरोगी राहिली तर तुम्हाला वरून वेगवेगळे केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याची गरजच पडणार नाही. वय आणि वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या कुणी थांबवू शकत नाही. पण काही खाद्य पदार्थ असे असतात जे त्वचा नेहमी निरोगी ठेवतात आणि तुम्हाला ऑक्सिडेटिव तणावापासून वाचवण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला तीन अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत जे त्वचा जास्त काळ तरूण आणि तजेलदार ठेवतात.

ढोबळी मिरची

लाल शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरचीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात जे वय वाढण्याची प्रक्रिया हळुवार करतात. तसेच लाल ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतात जे कोलेजन उत्पादनासाठी फार फायदेशीर असतात. यात कॅरोटीनॉयड नावाचं शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे त्वचेसाठी फार चांगले असतात.

रताळे

रताळ्याला रंग बीटा-कॅरोटीन नावाच्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे येतो जो व्हिटॅमिन ए सोबत परिवर्तित होतो. याने त्वचेचा लवचिकपणा कायम राहतो आणि त्वचेच्या कोशिकाही निरोगी राहतात. हे एक स्टार्चयुक्त कंदमूळ आहे. यात व्हिटॅमिन सी आणि ई सुद्धा भरपूर असतात. हे दोन्ही पोषक तत्व त्वचेला निरोगी ठेवतात.

पालक

पालक भाजी सगळ्यात पावरफुल भाजी मानली जाते. यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंस असतात. या सुपरफूड मानल्या जाणाऱ्या भाजीमधून आरोग्याला खूपसारे फायदे मिळते. जसे की, ऑक्सीडेटिव तणाव कमी करणारे, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणारे तसेच कॅन्सर सेल्स रोखणारे तत्वही या भाजीत असतात. या भाजीमुळे त्वचाही चांगली राहते.

पाणी

त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी पाणी फार महत्वाचं असतं. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं. पाण्यात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. त्वचा तरूण, निरोगी आणि चमकदार दिसते. त्यामुळेच दिवसभर कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी प्यावे.

Web Title: Eat these things regularly you will remain young for long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.