उन्हाळ्यात या 5 पद्धतीने खा कलिंगड, आरोग्याला मिळतील अनेक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:47 PM2024-04-22T16:47:10+5:302024-04-22T16:48:05+5:30
कलिंगडाचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आहारात समावेश करू शकता. ज्याद्वारे तुम्ही यापासून मिळणारे फायदे अधिक वाढवू शकता. कलिंगडाचं सेवन खालील 5 पद्धतीने कराल तर जास्त फायदे मिळतील.
Watermelon benefits : कलिंगडामध्ये अनेक आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजं असतात जे शरीरासाठी फार महत्वाचे असतात. उन्हाळ्यात डोळे, त्वचा आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासही हे मदत करतं. उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक याचं सेवन करतात. कारण यातून शरीराला भरपूर पाणी आणि पोषण मिळतं. कलिंगडाचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आहारात समावेश करू शकता. ज्याद्वारे तुम्ही यापासून मिळणारे फायदे अधिक वाढवू शकता. कलिंगडाचं सेवन खालील 5 पद्धतीने कराल तर जास्त फायदे मिळतील.
1) उन्हाळ्यात कलिंगड खाणं सगळ्यात चांगलं मानलं जातं. तुम्ही घरच्या घरी कलिंगडाचा ज्यूस तयार करू शकता. यात पाणी, कलिंगड, काळं मीठ आणि थोडे काळे मिरे टाकू शकता. काही बर्फाचे तुकडे टाकले तर एक ग्लास ताजा आणि थंडगार ज्यूत तयार होतो.
2) कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून एका भाड्यांत टाका आणि त्यात थोडं काळं मीठ टाका. उन्हाळ्यात रोज एक वाटी कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदे मिळतील. याने शरीर थंड आणि हायड्रेट राहतं.
3) तुम्ही कलिंगड ग्रिल करूनही खाऊ शकता. अनेकांना कलिंगड इतकं आवडतं की, काही लोक केकसोबतच बेकरी आयटममध्येही याचा समावेश करतात. यामुळे केकची टेस्टही कलिंगडासारखी लागते.
4) कलिंगडाची स्मूदी उन्हाळ्यात सेवन करणं एक चांगली पद्धत आहे. याने तुमचा नाश्ता चांगला होतो आणि यातून तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. कलिंगडाची स्मूदी बनवण्यासाठी कलिंगड, ग्रीक दही, स्ट्रॉबेरी, केळी मिक्स करा.
5) उन्हाळ्यात कुल्फी खाण्याची एक वेगळीच मजा असते. कलिंगडाची कुल्फी बनवण्यासाठी तुम्ही साखर न टाकता ताजी कीवी आणि कलिंगड घ्या. यात कमी कॅलरी असतात आणि टेस्टही भारी लागते. लहान मुलांना हे फार आवडेल.