उन्हाळ्यात टरबूज खा, मात्र काळजीही घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 10:53 AM2018-03-31T10:53:27+5:302018-03-31T16:23:27+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे, मात्र सोबतच काळजीही घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
* उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका संभवू शकतो. अशावेळी टरबूज सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.
* टरबूजात आढळणारे आर्जिनिन वंधत्व निवारणासाठी उपयोगी आहे. याच्या नियमित सेवनाने तुमचे वैवाहिक जीवनही सुखी राहील.
* आपल्या किडन्या सुस्थितीत राहण्यासाठीही टरबूज खाणे फायदेशीर आहे.शिवाय पोटात किंवा छातीत जळजळ होत असेल तर टरबूज खा. ते फायदेशीर ठरेल.
* त्वचेच्या आरोग्यासाठी टरबुजाचे सेवन फायदेशीर ठरते. टरबूजात अनेक अँटि-आॅक्सिडंट घटक असतात. त्याचप्रमाणे जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ यांचाही त्यात मोठ्या प्रमाणात साठा असतो. हे नियमितपणे खाल्ल्याने त्वचा उजळते.
* टरबूजात लायकोपीन व कॅरोटिनॉईड मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे ह्रदयाचे कार्य सुधारते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व ह्रदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
* टरबुजाच्या सेवनाने कर्करोगही दूर पळण्यास मदत होते. टरबुजात असणारे अनेक घटक कर्करोगाशी सामना करण्यास प्रभावी असतात.
* टरबुजात मोठ्या प्रमाणावर असणा-या फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यास मोठी मदत होते.
* टरबुजात अनेक प्रकारची जीवनसत्व आणि खनिजं असतात. पण, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ९५ टक्के टरबूज हे म्हणजे पाणीच असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत.
*टरबूज घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल?
कमी पैशात जास्त नफा मिळावा म्हणून विक्रेत्यांकडून टरबूजला विषारी बनविले जाते. टरबूज लवकर पिकावे तसेच लाल भडक दिसावे म्हणून केमिकल इंजेक्ट केले जाते. यामुळे असे टरबूज खाल्ल्याने फायदा ऐवजी शरीराला नुकसानच जास्त होते.
* टरबूज पिकविण्यासाठी आॅक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. सरकारने या इंजेक्शनवर कित्येक वर्षापासून बंदी घातली आहे. तरीही त्याचा सर्रास वापर सुरू आहे.
* आॅक्सिटोसिनने पिकविण्यात आलेल्या फळांचे सेवन केल्याने हार्माेन्स रिलेटेड आजार निर्माण होतात. याचा प्रभाव महिलांवर जास्त होतो.
* टरबूजमध्ये सोडियम सॅक्रिन आणि सिंथेटिक रंगाचा वापर केला जातो. टरबूजला गोड करण्यासाठी सॅक्रिन मिसळले जाते, मात्र हे आरोग्यासाठी घातक आहे.
* टरबूज घेण्यापूर्वी ते कापा, आवरणाच्या आतील भागाचा रंग फिकट पांढरा किंवा हिरवा असल्यास ते नैसर्गिक पिकलेले समजावे. जास्त लाल असल्यास त्यात सिंथेटिक रंग मिक्स असल्याचे समजावे
* टरबूज खाण्यापूर्वी १० ते १५ मिनिट पाण्यात ठेवावे, यामुळे त्याला लागलेले केमिकल्स निघून जातात.
* टरबूज खूप प्रमाणात शायनी वाटत असेल तर तेदेखील पूर्णपणे न पिकण्याली ओळख आहे.
* टरबूज घेण्यापूर्वी चारही बाजूने तपासूनच घ्यावे, छिद्र असलेले किंवा कापून ठेवलेले टरबूज घेऊ नये.