खा दही नियमित; फायदे आहेत अगणित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:24 PM2021-05-30T19:24:31+5:302021-05-30T19:25:58+5:30

दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्याशी निगडित समस्यांवर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. पण बरेचदा अनेकांना हा प्रश्न पडतो की दही खाण्याची नेमकी योग्य वेळ कोणती?

Eat yogurt regularly; The benefits are countless | खा दही नियमित; फायदे आहेत अगणित

खा दही नियमित; फायदे आहेत अगणित

googlenewsNext

दुधापासून तयार होणारा एक पौष्टीक पदार्थ म्हणजे दही. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी ६ आणि व्हिटामिन बी१२ इत्यादी पोषक घटक असतात. हे पोषक घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्याशी निगडित समस्यांवर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे.
पण बरेचदा अनेकांना हा प्रश्न पडतो की दही खाण्याची नेमकी योग्य वेळ कोणती? आमच्याकडे त्याचे उत्तर आहे. पाहुयात...


कधी खावे दही?
दही हे शक्यतो आपण दुपारच्या वेळी खाल्ले पाहिजे. दररोज दुपारी एक वाटी दही खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे दुपारी दररोज दही खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते. यासाठी आपण दररोज दही खाल्ले पाहिजे. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.


दही खाताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत
एक म्हणजे दह्यात फॅटचे प्रमाण अधिक असते. तसेच दही दुधापासून तयार होत असल्याने दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो.
रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार होते. आपले सौंदर्य अधिक उजळवण्यासाठी दही खावे. आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात.

Web Title: Eat yogurt regularly; The benefits are countless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.