रोजच्या आहारात 'या' फळाचा समावेश कराल, तर हृदयरोगांच्या टेन्शनमधून फ्री व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:26 AM2019-06-04T10:26:19+5:302019-06-04T10:31:20+5:30

वेगवेगळी फळं आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण धावपळीच्या जीवनात सगळीच फळं खाण्यात येतात असं नाही.

Eating blueberries daily decreases the risk of cardiovascular disease by 15 percent | रोजच्या आहारात 'या' फळाचा समावेश कराल, तर हृदयरोगांच्या टेन्शनमधून फ्री व्हाल!

रोजच्या आहारात 'या' फळाचा समावेश कराल, तर हृदयरोगांच्या टेन्शनमधून फ्री व्हाल!

Next

वेगवेगळी फळं आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण धावपळीच्या जीवनात सगळीच फळं खाण्यात येतात असं नाही. वेगवेगळ्या फळांमध्ये एक महत्त्वाचं फळ म्हणजे ब्लू-बेरीज. ब्लू-बेरीजमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. पण यात पोषक तत्त्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. ब्लू-बेरीज हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, हे आता रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, दररोज १५० ग्रॅम म्हणजेच साधारण १ वाटी ब्लू-बेरीज खाल्ल्याने कार्डिओवस्क्युलर म्हणजेच हृदयरोगांचा धोका १५ टक्क्यांनी कमी होतो.

इतरही बेरीजचा आहारात करा समावेश

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित या रिसर्चच्या निष्कर्षांनुसार, ब्लू-बेरीजसोबतच जर तुम्ही अशाप्रकारचे इतरही फळं जसे की, स्ट्रॉबेरी, रास्पबेरीसारख्या फळांचा आहारात समावेश करावा. याने हृदयरोगांचा धोका कमी होतो. या रिसर्चचे मुख्य लेखक ऐडिन कॅसिडी जे ब्रिटन यूनिव्हर्सिटी ऑफ इस्ट ऐन्ग्लियामध्ये प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, 'मेटाबॉलिक सिंड्रोममुळे हृदयाशी संबंधित स्ट्रोक आणि डायबिटीसचा धोका वाढतो. आणि हे आजार कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर स्टॅटिन्स आणि इतर काही औषधे देतात'.

 मेटाबॉलिक सिंड्रोमवर ब्लू-बेरीजच प्रभाव

अभ्यासकांनी या रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, ब्लू-बेरीज खाल्ल्यावर मेटाबॉलिक सिंड्रोमवर काय प्रभाव पडतो. मेटाबॉलिक सिंड्रोम एक अशी स्थिती आहे, ज्याने एक तृतीयांश वयस्क लोक प्रभावित आहेत. त्यांच्यात कमीत कमी तीन ३ रिस्क फॅक्टर्स आढळतात. त्यात हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड शुगर, कंबरेजवळ चरबी जमा होणे, गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होणे आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण अधिक होणे या गोष्टी आहेत.

१ वाटी ब्लूबेरीजने आजाराचा धोका १५ टक्के कमी

अभ्यासकांनी ५० ते ७५ वर्षादरम्यानच्या १३८ ओव्हरवेट आणि लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांचा या रिसर्चमध्ये समावेश केला होता. ज्यात मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या होती. या लोकांर ब्लू-बेरीजचा काय प्रभाव होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. रिसर्चचे सह-लेखक पीटर कर्टिस म्हणाले की, 'दररोज एक वाटी ब्लू-बेरीज खाल्ल्याने नर्व्हसंबंधी प्रक्रिया चांगल्या होतात, रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारलं आणि याने कार्डिओवस्क्युलर डिजीजचा धोका १५ टक्क्यांनी कमी झाला'.

Web Title: Eating blueberries daily decreases the risk of cardiovascular disease by 15 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.