घाईघाईने खाल्ल्याने जाऊ शकतो जीव, जेवण करताना फॉलो करा आयुर्वेदातील हे ३ नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:05 AM2024-11-26T11:05:29+5:302024-11-26T11:06:08+5:30
आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं.
हैदराबादमधील एका शाळेत दुपारचं जेवण करताना एका ११ वर्षीय मुलाचा वेदनादायी मृत्यू झाला. असं सांगण्यात आलं की, सहाव्या वर्गातील या विद्यार्थ्याने घाईघाईने एकत्र तीन पुऱ्या खाल्ल्या, ज्यामुळे त्याचा गळा पूर्णपणे चोक झाला. श्वास गुदमरल्याने त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथून त्याला सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेवरून आपल्याला हे समजतं की, जेवण करताना घाई करणं आपल्यासाठी किती घातक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं. अशात जेवण करताना आयुर्वेदातील तीन नियम नेमही फॉलो केले पाहिजे.
१) शांतपणे बसून जेवावे
आयुर्वेदात जेवण करण्याला एक पवित्र क्रिया मानलं जातं. जेवण करताना नेहमीच शांत वातावरणात बसायला हवं. घाईघाईने खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचन होत नाही. ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि इतरही पोटासंबंधी समस्या होतात.
२) छोटे छोटे घास चावून खा
आयुर्वेदात सांगितलं आहे की, अन्न योग्यपणे बारीक चावणं फार गरजेचं आहे. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खायला हवा. जेणेकरून चांगलं पचन व्हावं. घाईघाईने खाल्लेलं अन्न घशात अडकू शकतं किंवा पचन तंत्रावर दबाव टाकू शकतं.
३) जेवणावर लक्ष केंद्रीत करा
जेवण करताना टीव्ही बघणे, फोन बघणे किंवा इतर काही करणं चुकीचं आहे. याने पचनक्रियेवर वाईट प्रभाव पडतो. जेवण करतान केवळ जेवणावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तेव्हाच ते अन्न शरीराला लागतं. त्यातील पोषण मिळतात.
आणखी काही टिप्स
आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते. आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर साधारण 30 मिनिटांनी पाणी प्यावे. याने पचनक्रिया व्यवस्थित होते.
हैदराबादमधील घटना गंभीर इशारा आहे की, आपण आपल्या आणि मुलांच्या जेवणाच्या पद्धतीवर लक्ष द्यावं. वरील काही सोपे नियम फॉलो केले तर आरोग्यही चांगलं राहतं आणि जीवाला धोकाही होणार नाही.