तुम्हालाही उभे राहून जेवण करण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:38 PM2024-02-05T13:38:44+5:302024-02-05T13:40:37+5:30
आजकाल पार्ट्यांमध्ये किंवा एखाद्या लग्न समारंभात उभे राहून जेवण करणं हा एक नवा ट्रेंड आलाय.
Health Tips : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या सोयीनूसार काही सवयी अंगी लावून घेतो. ज्या घातक सवयी रोगांना आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यातील सर्वात नुकसानकारक सवय म्हणजे उभे राहून जेवन करणे. काही लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. लग्न समारंभात किंवा पार्टीच्या ठिकाणी उभे राहून जेवण करणे म्हणजे कल्चरचा भाग समजला जातो.
पूर्वीच्या काळी खाली जमिनीवर मांडी घालून जेवायला बसण्याची पद्धत होती. अलिकडे ही परंपरा लुप्त होत चालली आहे. बदलत्या काळानूरूप प्रत्येकाची जेवण करण्याची पद्धत वेगळी होत चालली आहे. काहींना उभे राहून जेवण करण्याची सवय असते तर काही जण डायनिंग टेबलवर बसून जेवण करतात.
पोटातील समस्यांमध्ये वाढ -
आरोग्य तज्ञांनूसार, उभे राहून जेवण करणे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते.
पाहायला गेल्यास जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो त्यावेळी पोटात अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे जेवण पचण्याची प्रकिया हळूवार होते आणि अपचन होते.
जर तुम्ही उभे राहून जेवण करत असाल तर त्यावेळेस अन्न सरळ आतड्यांपर्यंत पोहोचते. ज्यामुळे पोटात दुखणे किंवा आतड्यावर सूज येते. जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो तेव्हा ते खाल्लेलं अन्न पचन होण्यास जास्त वेळ लागतो. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की उभे राहून अन्न खाल्ल्याने किडनीच्या समस्या आणि स्टोनचा धोका वाढतो.
खाली बसून जेवण्याचे फायदे -
पायांची घडी घालून बसल्याने नसांमधील ताण दूर होतो आणि त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. याउलट उभे राहून जेवण केल्यास शरीराचं पॉश्चर बिघडतं. त्याचे शरीरावर गंभीर परिणामही होतात. याआधी लोक जमिनीवर खाली बसून जेवण करायचे. खाली मांडी घालून जेवायला बसणे ही एकप्रकारे योगाभ्यासाची क्रियाच म्हणावी लागेल. मांडी घालून बसण्याच्या प्रक्रियेमुळे तुमची पचनक्रिया सुधारते.