रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; गंभीर आजारांपासून ४ हात लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:34 AM2020-08-18T11:34:12+5:302020-08-18T11:41:06+5:30

सध्या कोरोनाकाळात सगळ्यांनाच आजारी पडण्याची भीती वाटते. अशा स्थितीत जर तुम्ही घरगुती उपायांनी स्वतःला फिट ठेवले तर सतत डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही.

Eating garlic on an empty stomach will protect you serious illnesses | रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; गंभीर आजारांपासून ४ हात लांब राहाल

रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; गंभीर आजारांपासून ४ हात लांब राहाल

googlenewsNext

स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू असतात या वस्तूंच्या सेवनानं शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यातीलच एक म्हणजे लसूण आहे. जेवणाला चव येण्यासाठी पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रिकाम्यापोटी लसूण खाल्यास शरीर निरोगी राहतं. सध्या कोरोनाकाळात सगळ्यांनाच आजारी पडण्याची भीती वाटते. अशा स्थितीत जर तुम्ही घरगुती उपायांनी स्वतःला फिट ठेवले तर सतत डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे.

पचनक्रिया सुधारते

जे लोक सकाळी लसूण खातात. त्यांची पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहते. यामुळे पोटाचे विकार दूर होतात. वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं. रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड क्लोटिंग थांबतं. 

गंभीर आजारांपासून बचाव

पाण्यासोबत कच्चा लसूण सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्यानं विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा मार्ग आहे. याद्वारे तुम्ही मधूमेह, कॅन्सर, डिप्रेशन यांसारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशीर ठरतं. एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील संतुलित राहते.

हाडांसाठी फायदेशीर 

हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खायला हवीत. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दातदुखीचा त्रास असेल लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. दातांमध्ये दुखणे सुरु झाल्यास लसणीचा तुकडा गरम करुन दुखत असलेल्या दाताखाली ठेवा. 

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

लसूणात अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्यास  गंभीर आजारांपासून लांब राहता येतं.

हे पण वाचा -

'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

Web Title: Eating garlic on an empty stomach will protect you serious illnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.