रोज जेवणासोबत खा 'ही' एक गोष्टी, शरीरातील चरबी वितळून लगेच येईल बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:24 PM2024-09-09T15:24:25+5:302024-09-09T15:24:59+5:30
Green Chilli : तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खायला हवं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Green Chilli : घरचं जेवण हे सगळ्यात आरोग्यदायी असतं. चपाती आणि भाजी खाऊन वजनही केलं जाऊ शकतं. घरच्या जेवणामध्ये फॅट कमी आणि व्हिटॅमिन्स व मिनरल्स जास्त असतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचं सेवन करतात. अशात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खायला हवं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हिरव्या मिरचीचे फायदे...
हिरव्या मिरचीला नॅचरल फॅट बर्नर मानलं जातं. याने शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सहजपणे होतात. त्यामुळे जे लोक हिरव्या मिरच्या खातात ते न खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त हेल्दी असतात. बरेच लोक हिरव्या मिरच्यांचा ठेचा खातात. इतकंच नाही तर वेगवेगळ्या पदार्थांमध्येही त्यांचा समावेश करतात. हिरव्या मिरच्यांमध्ये आयर्न, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि एक भरपूर असतं. तसेच यात खनिजही असतात.
१) नॅचरल अॅंटी-ऑक्सीडेंट
मिरच्यांमध्ये एक पॉवरफुल अॅंटी-ऑक्सिडेंट आहे ज्याने शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्या दूर होतात. हे फ्री रॅडिकल्स विरोधात लढतात आणि कोशिकांना नुकसान होण्यापासून वाचवतात.
२) तणाव होईल कमी
मिरचीच्या सेवनामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. याने तुमचा मूड चांगला होतो.
३) अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण
ल्यूटिनमध्यें अॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे सूज कमी करण्यास मदत मिळते. याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
४) हृदयाचं आरोग्य
ल्यूटिनच्या माध्यमातून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर, ट्रिपल वेसल डिजीज आणि कोरोनरी आर्टरी डिजीजपासून बचाव होतो.
५) अॅंटी कॅन्सर तत्व
प्लांट बेस्ड फूड्समध्ये आढळणारे ल्यूटिनमध्ये अॅंटी-कॅन्सर गुण असतात. हे कॅन्सर निर्माण करणारे तत्वांविरोधात लढतात आणि याने गंभीर आजारांपासून बचाव होतो.
६) हाडे होतात मजबूत
ल्यूटिन असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने हाडांचं आरोग्य चांगलं होतं. याने तुमची हाडे मजबूत होतात आणि हाडांचा आजार ऑस्टियोपोरोसिस चा धोकाही कमी करतात.
७) डोळे चांगले राहतील
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस होऊ शकते. गंभीर स्थितीमध्ये यात तुमच्या डोळ्याची दृष्टी नेहमीसाठी जाऊ शकते. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं जे डोळ्यांची दृष्टी वाढवतं.