ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 10:06 AM2019-05-27T10:06:58+5:302019-05-27T10:12:49+5:30
ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची अनेकांना सवय असते. तुम्हालाही ही सवय आहे का?
(Image Credit : New York Post)
ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची अनेकांना सवय असते. तुम्हालाही ही सवय आहे का? जर तुम्हालाही ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण या सवयीमुळे वेगवेगळे आजार बसल्या जागी होतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, ऑफिसमध्ये कामादरम्यान जंक किंवा अनहेल्दी फूड खाल्ले तर लठ्ठपणा, डायबिटीस आणि हार्ट संबंधी आजार होण्याचा धोका असतो.
(Image : USA Today)
प्रत्येक व्यक्तीचा सर्वात जास्त वेळ हा ऑफिसमध्येच जातो. त्यामुळे काम करताना अनेकांची काहीना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी व्यवस्थित जेवण न करता अनेकजण चिप्स, सॅंडविच, बर्गर यांसारखे अनहेल्दी फूड खातात. यामुळे होतं असं की, जेवण स्कीप केलं जातं. हळूहळू ही सवय अधिकच वाढते आणि नंतर ऑफिसच्या किंवा घराबाहेरही याप्रकारचे पदार्थ खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण आरोग्यासाठी हे अजिबातच योग्य नाहीये.
(Image Credit : Reader's Digest)
अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटीव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्च सांगतो की, याप्रकारच्या सवयीमुळे अनेकप्रकारचे आजार होऊ शकतात. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी एका अमेरिकन हॉस्पिटलमधील ६०० अशा कर्मचाऱ्यांना निवडले जे नियमितपणे हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा वापर करत होते. या कर्मचाऱ्यांनी कामादरम्यानच कॅन्टीनमधून जंक फूड घेतलं. त्यांचं निरीक्षण केल्यावर कळालं की, जे लोक कॅन्टीनमधून जंक फूड आणि अनहेल्दी फूड घेत होते, त्यांच्यात सर्वात जास्त लठ्ठपणा बघितला गेला. इतकेच नाही तर या कर्मचाऱ्यांमध्ये डायबिटीस आणि हार्ट संबंधी आजारांची समस्याही अधिक बघायला मिळाली.
(Image Credit : Greatist)
या रिसर्चवरून हे लक्षात येतं की, कामाच्या ठिकाणी पौष्टीक खाण्या-पिण्याच्या सवयीचा डाएट आणि आरोग्यावर काय प्रभाव पडतो. तसेच यावरूनही हेही लक्षात येतं की, हेल्दी लाइफस्टाइलसाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी हेल्दी डाएट किती गरजेची आहे.
(Image Credit : The Conversation)
हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या जेसिका एल मेकर्ली यांच्यानुसार, 'वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये चांगला बदल आणि सुधारणा केली जाऊ शकते. पण असे प्रोग्राम तयार करणे फार चॅलेंजिंग काम होतं. मात्र, आशा आहे की, आमच्या या निष्कर्षांना डोळ्यासमोर ठेवून या दिशेने काम केलं जाईल'.