ब्रेडच्या बाजूचा जळलेला भाग खाल्ल्याने होऊ शकतो 'हा' अतिगंभीर आजार, संशोधनातून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 04:44 PM2021-12-24T16:44:37+5:302021-12-24T16:47:37+5:30

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ब्रेडचा (Bread) जळलेला भाग खात असाल तर, तुमची ही सवय कर्करोगाला आमंत्रण ठरू शकते.

eating part of side of the bread can cause cancer study says | ब्रेडच्या बाजूचा जळलेला भाग खाल्ल्याने होऊ शकतो 'हा' अतिगंभीर आजार, संशोधनातून इशारा

ब्रेडच्या बाजूचा जळलेला भाग खाल्ल्याने होऊ शकतो 'हा' अतिगंभीर आजार, संशोधनातून इशारा

Next

तुम्ही ज्या पद्धतीने खाता किंवा अन्न शिजवता त्या सवयींमुळेदेखील तुम्हाला कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ब्रेडचा (Bread) जळलेला भाग खात असाल तर, तुमची ही सवय कर्करोगाला आमंत्रण ठरू शकते. जेव्हा तुम्ही उच्च तापमानात अन्नपदार्थ जास्त काळ शिजवता, तेव्हा त्यात अ‌ॅक्रिलामाइड (Acrylamide) तयार होतं. त्यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका वाढतो.

कर्करोगाचा धोका वाढेल
जळलेल्या अन्नपदार्थांमध्ये अ‌ॅक्रिलामाइड हा एक उच्च संपृक्तता (High concentration) असलेला घटक असतो. हा विशेषतः पिष्टमय पदार्थांमध्ये आढळतो, जेव्हा हे पदार्थ उच्च तापमानात बराच काळ शिजवले जातात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. झी न्यूजनं दिलेल्या बातमीत याविषयी माहिती दिली आहे. या खाद्यपदार्थांमुळे सामान्यतः कर्करोगाचा धोका नसतो. परंतु, आपण ते उच्च तापमानात जास्त वेळ शिजवले आणि थोडेसे जळल्यानंतरही ते खाल्ले तर कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळंही असा परिणाम होतो
तंदूर, बेकिंग, बार्बेक्युइंग, तळणं, ग्रिलिंग, टोस्टिंग किंवा भाजणं यासारख्या पारंपरिक स्वयंपाक पद्धती अ‌ॅक्रिलामाइडच्या निर्मितीला चालना देतात. स्वयंपाकाच्या या पद्धती आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो. कारण त्यात तेलाचा कमी वापर केला जातो. परंतु पिष्टमय पदार्थ जास्त वेळ शिजवल्यास किंवा शिजवताना जळल्यास कर्करोग होऊ शकतो.

कॅन्सर रिसर्च यूके या डिजिटल पोर्टलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात हे सांगण्यात आलं आहे. या अहवालात पुढं म्हटलंय की अ‌‌क्रिलामाइडमुळं कर्करोगाचा धोका वाढतो का यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. अ‌ॅक्रिलामाइडमुळं कॅन्सरचा धोका निर्माण होतो का किंवा रोजच्या आहारात समाविष्ट असलेले हे पदार्थ या आजाराचा धोका वाढवतात का, यावर अधिक संशोधन व्हायला हवं.

याची देखील काळजी घ्या
तज्ज्ञांच्या मते, अन्नाचं स्वरूप, त्याचा प्रकार याचा कर्करोगाशी संबंध असतो. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ताजी फळं, भाज्या, फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय जास्त साखर, मीठ, स्निग्ध पदार्थयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ नका.

Web Title: eating part of side of the bread can cause cancer study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.