बटाटे खाऊन वजन वाढतं, असं तुम्हालाही वाटतं का? जाणून घ्या रिसर्च काय सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:56 AM2024-08-24T11:56:26+5:302024-08-24T12:12:00+5:30

Potato For Weight Gain :वजन कमी करण्यासाठी लोक आहारातून बटाटे दूर करतात. बटाटे खाऊन वजन वाढतं असं लोकांना वाटतं की, कारण यात कार्ब्स भरपूर असतं. 

Eating potatoes increase weight, know truth from the expert | बटाटे खाऊन वजन वाढतं, असं तुम्हालाही वाटतं का? जाणून घ्या रिसर्च काय सांगतो...

बटाटे खाऊन वजन वाढतं, असं तुम्हालाही वाटतं का? जाणून घ्या रिसर्च काय सांगतो...

Potato For Weight Gain : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल करतं. असे अनेक लोक जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांन वाटतं की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच बटाटे खाऊन वजन वाढतं का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत डॉक्टर सांगतात की, बटाटे खाऊन वजन वाढेल हे काही गरजेचं नाहीये. वजन कमी करण्यासाठी लोक आहारातून बटाटे दूर करतात. बटाटे खाऊन वजन वाढतं असं लोकांना वाटतं की, कारण यात कार्ब्स भरपूर असतं. 

बटाटे खाऊन खरंच वजन वाढतं का?

एक्सपर्ट सांगतात की, ज्या लोकांना वजन वाढवायचं असतं त्यांच्यासाठी बटाटे खाण्याची पद्धत वेगळी असते. जनरल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या एका रिसर्चनुसार, वजन वाढण्यामागे तुमचा एकंदर आहार गरजेचा असतो. केवळ बटाटे खाऊन वजन वाढत नाही.

बटाटे खाण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. जर तुम्ही बटाटे फ्राय करून लोणी किंवा क्रीमसोबत खात असाल तर तुमचं वजन वाढेल. लोणी आणि क्रीम बटाट्यासोबत मिक्स केल्याने कॅलरीचं प्रमाण वाढतं जे ज्यामुळे फॅट वाढतं. बटाटे खाल्ल्याने शरीराला भरपूर शक्ती मिळते. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. 

पचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही फायबर भरपूर असलेले बटाटे खाऊ शकता किंवा अपचन वा बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही बटाटे खाऊ शकता. बटाटे खाऊन वजन वाढू शकतं, पण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं, ज्यामुळे ऊर्जा मिळते. पण बटाटे बनवण्याची पद्धत आणि प्रमाण यामुळे वजन वाढू शकतं.

बटाटे खाऊन वजन वाढण्याचं मुख्य कारण

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतं. जे शरीरात ग्लूकोजच्या रूपात अवशोषित होतं आणि वजन वाढू शकतं. बटाटे तळून खाल्ल्याने वजन वाढू शकतं. कारण यात अतिरिक्त कॅलरी अधिक असतात. मात्र, बटाट्यामधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरासाठी आवश्यक असतात.

Web Title: Eating potatoes increase weight, know truth from the expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.