डाळी नेहमीच खात असाल पण त्यांचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील, वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:08 PM2020-02-11T15:08:58+5:302020-02-11T15:23:38+5:30
संयुक्त राष्ट्रानीं जगभरात सोमवारी वर्ल्ड पल्सेस डे साजरा केला.
(image credit-vegan food and living)
संयुक्त राष्ट्रांनी जगभरात सोमवारी वर्ल्ड पल्सेस डे साजरा केला. म्हणजेच आपण आहारात वापरत असलेल्या डाळींचा जागतीक दिवस साजरा केला. हा दिवस साजरा करण्याची सुरूवात एक वर्ष आधी पासून २०१९ मध्ये सुरूवात झाली. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा की लोकांना डाळींच्या आहाराचे सेवन किती फायदेशीर आहे हे सांगणे. मसुर, मुग, उडीद, कुळिद आणि तुरीची डाळं अशा वेगवेगळ्या प्रकरच्या डाळींचा समावेश आपण आहारात करत असतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशने डाळींच्या आहाराबाबत काही गोष्टी मांडल्या आहेत. पोषक घटकांचा साठा डाळींमध्ये असतो. मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि मॅग्नेशियम असतं. डाळीत असलेल्या पोषक घटकांमुळे WHO ने डायबिटिस आणि हृदयरोगासाठी फायदेशीर मानले आहे. या आजारांमध्ये डाळी खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. डाळी या प्रोटिन्सच्या मुख्य स्त्रोत आहेत. चला तर मग जाणून घेऊया डाळींच्या सेवनाने शरीराला कोणते फायदे मिळतात.
डाळीत फायदेशीर तत्व आहेत. त्यात टॅन्सिन्स सुद्धा असतात. डाळीत असलेले एन्टी ऑक्सीडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळते. डाळीत आढळणारे तंतुमय पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात.
डाळीत फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. तसंच डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. परीणामी डाळींचा आहार डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर असतात. डाळ खाल्ल्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते. त्यासोबतच याने ब्लडमधील इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हलही नियंत्रणात ठेवते.
वजन कमी करण्यासाठी तेलकट आहार न घेता जर तुम्ही डाळींचे सेवन केले तर शरीरासाठी फायदेशीर ठरेल. डाळींमध्ये आर्यन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यासाठी डाळींचा आहार फायदेशीर ठरत असतो.
शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. या डाळीचे सेवन हाडं, दात, नखांना मजबूत करते. डाळीत पोटॅशियम प्रमाण भरपूर असते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राखण्यास डाळीच्या सेवनाने उपयोग होतो. ( हे पण वाचा-पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय? 'या' उपायांनी लठ्ठपणा करा दूर)
आयर्नची कमतरता असेल तर उडीद डाळ आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. हे खाल्याने शरीराला ताकद मिळते. मासिक पाळी असताना महिलांनी उडीद डाळ आवर्जून खावी, कारण या दिवसात आयर्नची कमतरता होते. (हे पण वाचा-पाळी थांबणार असेल तर शरीरात होतात 'हे' बदल, वाचा कोणते?)