तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 12:29 PM2018-08-07T12:29:35+5:302018-08-07T12:30:25+5:30

अनेकदा आपण काही गोष्टी आपल्या नकळत विसरून जातो. त्यामध्ये बऱ्याचदा महत्त्वाच्या गोष्टींचाही समावेश होतो. कामाच्या गडबडीमध्ये किंवा धावपळीमध्ये असं झालं तर ठिक आहे. पण जर सारखंच असं होऊ लागलं तर मात्र या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Eating these things will Grow your Memory | तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश!

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश!

Next

अनेकदा आपण काही गोष्टी आपल्या नकळत विसरून जातो. त्यामध्ये बऱ्याचदा महत्त्वाच्या गोष्टींचाही समावेश होतो. कामाच्या गडबडीमध्ये किंवा धावपळीमध्ये असं झालं तर ठिक आहे. पण जर सारखंच असं होऊ लागलं तर मात्र या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळा आपण वस्तू कुठेतरी ठेवतो आणि विसरून जातो. असं वारंवार होत असेल तर तुमची स्मरणशक्ती कमजोर होण्याची ही लक्षणं आहेत, हे वेळीच लक्षात घ्या. असं होणं फार गंभीर नाही. आपल्या रोजच्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यानं तुमची स्मरणशक्ती स्ट्राँग होण्यास मदत होईल. जाणून घेऊयात अशा पदार्थांबाबत ज्यांचं सेवन केल्यानं तुमच्या मेंदूला चालना मिळेल आणि तुमची स्मरणशक्तीही स्ट्राँग होण्यास मदत होईल. 

टॉमेटो -

यामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. तुम्ही जर तुमच्या आहारात सलाडच्या स्वरूपात टॉमेटोचा वापर केलात तर तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.

मनुका -

यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. दररोज सकाळी 15-20 मनुके पाण्यात भिजवून खाल्यानं रक्ताची कमतता दूर होते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासही मदत होते. 

भोपळ्याच्या बिया -

यामध्ये झिंक तत्व मोठ्या प्रमाणात असतं. जे मानसिक आरोग्य चांगले राखण्यास फायदेशीर ठरतं. 

ऑलिव्ह ऑईल -

याचा उपयोग जेवण तयार करण्यासाठी करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त चपातीवर तुपाच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल लावून खावं. त्यामुळे मेंदूला चालना मिळण्यास मदत होते. 

आहार तज्ज्ञांनुसार, मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूडचं जास्त प्रमाणात सेवन करणं टाळा. याव्यतिरिक्त अन्य हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं मेंदूचं आरोग्य राखण्यास मदत होते. 

टिप : वरील उपाय केल्यानंतरही विसरण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.  

Web Title: Eating these things will Grow your Memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.