तुम्हीही लिंबाचं जास्त सेवन करता का? या समस्यांचा करावा लागू शकतो सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 09:26 AM2023-04-04T09:26:02+5:302023-04-04T09:26:13+5:30

Side Effects Of Lemon: प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितलं की,  जर आपण लिंबाचा अधिक सेवन करत असाल तर शरीराला काय काय नुकसान होतं.

Eating too lemon side effects harmful disadvantages | तुम्हीही लिंबाचं जास्त सेवन करता का? या समस्यांचा करावा लागू शकतो सामना

तुम्हीही लिंबाचं जास्त सेवन करता का? या समस्यांचा करावा लागू शकतो सामना

googlenewsNext

Side Effects Of Lemon: कोरोना काळापासून लोकांचा इम्यूनिटी बूस्ट करण्यावर चांगलाच जोर वाढला. यासाठी लोक लिंबाचं अधिक करू लागले, कारण यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते.  तसेच ज्या लोकांना वजन कमी करायचं असतं ते सुद्धा लिंबाच्या रसाचं सेवन करतात. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, कोणत्याही गोष्टीची अति केली तर त्याने नुकसान होतं. तेच लिंबाबतही लागू पडतं. लिंबाचं जास्त प्रमाणात सेवन कराल तर त्याने शरीराला नुकसान पोहोचतं. प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितलं की,  जर आपण लिंबाचा अधिक सेवन करत असाल तर शरीराला काय काय नुकसान होतं.

1. टॉन्सिल्सची समस्या

जर तुम्ही लिंबू पाणी जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर तुमच्या घशाला नुकसान पोहोचू शकतं. कारण आंबट पदार्थांचं जास्त सेवन केल्याने घशात वेदना आणि टॉन्सिलची समस्या वाढू शकते.

2. दातांचं नुकसान

लिंबामध्ये अॅसिडिक तत्व जास्त असतं ज्याने दात स्वच्छ राहण्यास मदत मिळते. पण याचं जास्त सेवन केलं तर याने दातांचं नुकसानही होतं. लिंबाचा रस जेव्हा दातांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा याने दातांच्या वरच्या थराचं म्हणजे इनॅमलचं नुकसान होतं. अशात जेव्हा लिंबाचं सेवन केल्यावर लगेच टूथब्रश करणं टाळलं पाहिजे. अशावेळ साध्या पाण्याने गुरळा करणं चांगलं राहतं.

3. इनडायजेशन

लिंबाला नेहमीच डायजेशनसाठी चांगलं मानलं जातं. पण तुम्ही फार जास्त लिंबू पाणी प्याल तर याचा प्रभाव उलटा होऊ शकतो. लिंबाच्या अधिक सेवनाने अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्ससारखा आजार होऊ शकतो. तुमची पचन क्रिया बिघडते. 

Web Title: Eating too lemon side effects harmful disadvantages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.